जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये विकासकामांना जोर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2019
Total Views |




श्रीनगर
: जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी केंद्र सरकारने नवीन प्रकल्प आणण्यास सुरुवात केली आहे. कलम ३७० जम्मू-काश्मीरमधून मागे घेण्यात आले त्याचबरोबर पुनर्गठन विधेयक मंजूर होऊन १ महिना उलटला आहे. या १ महिन्यांतच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी अनेक नवीन प्रकल्पांना ग्रीन सिग्नल दिले आहेत. त्याचबरोबर जवळपास सर्व मंत्रालये जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी सातत्याने योजना आखत आहेत.


वीजपुरवठ्यासाठी २७० कोटी मंजूर

केंद्र सरकारने श्रीनगरमधील वीजपुरवठा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ६ नवीन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. ४ सप्टेंबर रोजी उपायुक्त डॉ. शाहिद इक्बाल चौधरी यांनी माध्यमांना सांगितले की केंद्र सरकारने २७० कोटी रुपये खर्च करून ६ नवीन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या नवीन प्रकल्पांमुळे श्रीनगरमधील वीजपुरवठा सुधारेल. हे प्रकल्प त्वरीत पूर्ण करणे हे जिल्हा प्रशासनाचे उद्दीष्ट असल्याचेही ते म्हणाले.

 


७ लाख सफरचंद व्यापाऱ्यांना लाभ मिळेल

श्रीनगरचे उपायुक्त डॉ.शाहिद इक्बाल चौधरी आणि कृषी संचालक एजाज भट्ट यांनी परिमपोरा येथील फळ उत्पादक मार्केटला भेट दिली. जम्मू-काश्मीर प्रशासन राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघामध्ये सामील झाल्यामुळे ही भेट झाली आहे. ही संस्था जम्मू आणि काश्मीर राज्यातील सफरचंद उत्पादकांकडून सफरचंद खरेदी करेल. ज्याचा फायदा ७ लाखांहून अधिक सफरचंद उत्पादक व्यापाऱ्यांना होईल.


श्रीनगरमध्ये ग्रंथालयाचे उदघाटन

श्रीनगरमधील डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ६ सप्टेंबर सेंट्रल लायब्ररीचे आयपीएस विजय कुमार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या ग्रंथालयात सुमारे ११ हजार पुस्तके आहेत. या ग्रंथालयातून विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी मिळावं आणि मुलांना वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.




राजौरी याठिकाणी महिला शक्ती केंद्राची स्थापना

 

महिला व बाल विकास मंत्रालयाने राजौरी जिल्ह्यातील महिलांसाठी महिला शक्ती केंद्र सुरू केले. हे नजीकच्या खेड्यात राहणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करेल.


लेह
जिल्ह्यात मोबाइल प्रदर्शन व्हॅनचा शुभारंचा

६ सप्टेंबर रोजी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद पटेल यांनी लडाखच्या लेह जिल्ह्यात मोबाइल प्रदर्शन व्हॅनला हिरवा झेंडा दाखविला. शालेय विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने आणि अवकाश निरीक्षणाशिवाय इतर कार्यक्रम आयोजित करणारी ही व्हॅन लडाख प्रदेशातील पहिले मोबाईल प्रदर्शन वाहन असेल. या व्हॅनमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून ग्रामीण भागातील शाळांमध्ये वर्षभर अशी प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत. प्रल्हाद पटेल यांनी २ ऑगस्टला पर्यटन दिनाच्या दिवशी लडाखमध्ये पर्यटन कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते की हे पर्यटन कार्यालय लडाखला समर्पित असेल आणि लडाखमधील पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी काम करेल. पर्यटन कार्यालय प्रदेशातील महसूल आणि रोजगाराला चालना देईल. या कार्यालयाचे पर्यटन दिनी म्हणजे २७ सप्टेंबर रोजी उदघाटन केले जाईल.



 

@@AUTHORINFO_V1@@