'आप' सरकार कन्हैया कुमारच्या पाठीशी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2019
Total Views |
 


देशद्रोहाचा खटला चालवण्याच्या परवानगीला नकार ?


 

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या सरकारने कन्हैया कुमार आणि अन्य नऊ जणांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलीसांची परवानगी नाकारली आहे. फेब्रुवारी २०१६मध्ये जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) संकुलात झालेल्या कार्यक्रमावेळी कथित देशविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी कन्हैया आणि अन्य नऊ जणांना अटक करण्यात आली होती.

 

या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटल्यानंतर त्यानंतर जेएनयू विद्यार्थी परिषदेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमारला अटक झाली होती. दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैय यांनी याप्रकरणी आपले मत व्यक्त केले असून पोलिसांनी सादर केलेल्या साक्षीपुराव्यांनुसार कन्हैया आणि अन्य विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवला जाणार नसल्याचे ते म्हणाले.

 

न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आप सरकार आपले मत मांडणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांना या प्रकरणी दिल्ली सरकारचे म्हणणे सांगण्यात येणार आहे. देशद्रोह आणि भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्यासारख्या गंभीर प्रकरणांत न्यायालय पोलिसांच्या आरोपपत्रावर सुनावणी घेऊ शकत नाही. यासाठी संबंधित राज्याच्या गृहमंत्रालयाची मंजुरी आवश्यक असून अंतिम निर्णय न्यायालयावरच अवलंबून असणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@