आधी वंदू तुज मोरया।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2019   
Total Views |


धार्मिक उत्सव असणार्‍या गणेशोत्सवातील सांस्कृतिक रीत नाशिकच्या गणेशोत्सवाची खासियत आहे
. तसेच, अत्यंत शिस्तबद्ध आयोजन आणि पारंपरिकता यांचा संगम येथील उत्सवात दिसून येतो. येथील गुलालवाडी व्यायामशाळा यांचे लहानथोर असे सर्वच वयोगटातील शिस्तबद्ध लेझीम पथक हे नाशिकमधील गणेशोत्सवाचे खास आकर्षण असते. गणेशोत्सव काळात नाशिकनगरीत घुमणारे नाशिक ढोलचे आवाज हे येथील गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल.

नाशिक नगरीत सर्वत्र गणपतीची धामधूम आणि मंगलमय वातावरण यांची अनुभूती सध्या येत आहे. धार्मिक उत्सव असणार्‍या गणेशोत्सवातील सांस्कृतिक रीत नाशिकच्या गणेशोत्सवाची खासियत आहे. तसेच, अत्यंत शिस्तबद्ध आयोजन आणि पारंपरिकता यांचा संगम येथील उत्सवात दिसून येतो. येथील गुलालवाडी व्यायामशाळा यांचे लहानथोर असे सर्वच वयोगटातील शिस्तबद्ध लेझीम पथक हे नाशिकमधील गणेशोत्सवाचे खास आकर्षण असते. गणेशोत्सव काळात नाशिकनगरीत घुमणारे नाशिक ढोलचे आवाज हे येथील गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. गणेशोत्सवाच्या आधी सुमारे ४ ते ६ महिने शहरातील विविध ढोलपथके आपला सराव करत असतात. अत्यंत शिस्तबद्ध, लय, ताल यांना धरून गणपती काळात करण्यात येणारे ढोलवादन हे प्रसिद्ध आहे. या ढोलच्या वाढणार्‍या लोकप्रियतेमुळे नाशिक शहरात बर्‍यापैकी डीजेचा आवाज कमी झाल्याचे यंदाच्या गणेशोत्सवात दिसून येत आहे. नाशिकच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गणेशमंडळे आकर्षक विद्युत रोषणाईसह सामाजिक,धार्मिक, आध्यात्मिक, देखावे साकारण्यावर विशेष भर देत असतात. त्यामुळे पौराणिक महत्त्व असणार्‍या नाशिक नगरीत आध्यात्मिक देखाव्यांच्या साकारण्यामुळे भाविकांना पौराणिक महत्त्व आणि इतिहासाची उजळणी होण्यास मदत होते. भक्तीमय वातावरणात नाशिक नगरीला रंगवून टाकणार्‍या विविध गणेशमंडळांनी आपले सामाजिक भानदेखील या गणेशोत्सवात जपल्याचे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातील मंडळांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलनाची मोहीम उभारल्याचे या गणेशोत्सवात पाहावयास मिळत आहे. दरम्यान, नाशिक नगरीत ३६ महत्त्वाची गणेश मंडळे असून त्यांच्यामुळे नाशिक नगरीची शान वाढते. गणेशोत्सव म्हटला की, भक्तीपेक्षा देखावा निर्माण करणारे कार्यकर्ते आपणास पाहावयास मिळतात. मात्र, नाशिकमधील काही मंडळांनी गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि या काळात गणेशाची करावयाची भक्ती यांचा संगम साधण्यास महत्त्व दिले आहे. अनेक मंडळांच्या वतीने सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे खर्‍या अर्थाने नाशिकमधील गणेशोत्सव सध्या मोरयाला वंदन करणारा ठरत आहे.


नयामाधारित गणेशोत्सव


तीर्थक्षेत्राच्या ठायी आयोजित होणारे कोणतेही सण
-उत्सव म्हणजे पर्यावरणीय समस्यांचे उगमस्थान असे दिसून येते. धार्मिक उत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य, नैवेद्य आणि इतर सामग्री यांचे होणारे संचयन यामुळे शहराचे पावित्र्य आणि पर्यावरण हेदेखील धोक्यात येत असतात. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात नाशिक महानगरपालिका आणि रोटरी क्लब यांनी पर्यावरणस्नेही गणेशोत्सवावर भर दिला आहे. निर्माल्य संकलन करणारा गणेशरथ नाशिक शहरात फिरविण्यात येत असून त्यात विविध मंडळे आपले निर्माल्य टाकत आहे. एरवी याच निर्माल्याची हक्काची जागा म्हणून गोदापात्र गृहीत धरले जात असे. मात्र, या रथामुळे गोदेचे प्रदूषण रोखण्यासदेखील मोठी मदत होणार आहे. तसेच, गणेशोत्सव काळात रस्त्यात टाकले जाणारे मंडप आणि त्यामुळे वाहतुकीचा होणारा खोळंबा हे आजवर पाहिले गेलेले चित्र सध्या नाशिकमध्ये दिसून येत नाही. रस्ता हा गणेशोत्सव काळात आपलाच आहे, त्यामुळे तो आपण हवा तसा बंद करू शकतो, असे मानणारा कार्यकर्ता वर्ग उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्या माध्यमातून शहरातील जवळपास सर्वच लहानमोठ्या गणेशोत्सव मंडळांची नुकतीच तपासणी करण्यात आली. यात सर्वच गणेशमंडळांनी आवश्यक त्या परवानग्या घेतल्याचे आणि त्या गणेशोत्सवाच्या ठिकाणी दर्शनी भागात लावल्याचे दिसून आले. त्यामुळे पर्यावरणस्नेही आणि नियमाधारित गणेशोत्सव सध्या नाशिक नगरीत पाहावयास मिळत आहे. गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडळे रोजच्या आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करत असतात. तसेच या काळात मंडळांच्या वतीने सत्यनारायण पूजेचेदेखील आयोजन व मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप करण्यात येते. मात्र, वाटप करण्यात येणार्‍या प्रसादाची गुणवत्ता खराब असल्यास त्यातून विषबाधा होण्याचा धोकादेखील जास्त असतो. त्यामुळे गणेशोत्सव काळात वाटप करण्यात येणारा प्रसाद कसा असावा, याबाबत नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या माधमातून निकष जाहीर करण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींवरुनच नाशिकमध्ये यंदाचा गणेशोत्सव खर्‍या अर्थाने कोणतेही विघ्न येणार नाही याची सजगता बाळगत साजरा केला जात आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@