जिओ गीगाफायबरचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली रिलायन्स जिओची बहुप्रतिक्षित ब्रॉडबॅंण्ड सेवा 'जिओ गीगा फायबर' गुरुवारी ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना वेलकम ऑफरमध्ये भरगोस सवलत देण्यात येणार आहे. ही सेवा फक्त इंटरनेट ब्रॉडबॅँण्डच नाही, तर टेलिफोन, टीव्ही, सेट ऑफ बॉक्स आदी सेवा देणार आहे. या सर्व सेवा पहिले दोन महिने मोफत असणार आहेत. मात्र, याचा फायदा जिओच्या प्रिव्ह्यू ग्राहकांनाच मिळणार आहे. जिओ फायबरतर्फे कंपनी १०० एमबीपीएस ते १ जीबीपीएस सेवेचा स्पीड देणार आहे.

 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, वेलकम ऑफरमधून प्रिव्ह्यू ग्राहकांना जिओ फायबर सेवा सुरुवातीचे दोन महिने मोफत मिळू शकते. म्हणजे सध्या ज्यांच्याकडे जिओ गीगाफायबर आहे त्यांना लॉन्चिंगनंतर दोन महिने कोणतेही शुल्क मिळणार नाही. जिओ गीगाफायबरसाठी जमा केलेली अडीच हजारांची रक्कम ग्राहकांना केव्हाही परत मिळू शकते.

 

भरावे लागणार इतके शुल्क

गीगा फायबर लॉन्च झाल्यानंतर ही सेवा खरेदी करणाऱ्यांना दीड हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. ते ग्राहकांना परत मिळू शकतात. त्यासह एक हजार रुपये इन्स्टॉलेशन चार्ज करावे लागतील.

 

सातशे रुपयांपासून सुरू होणार प्लान

जिओचा सर्वात कमी किमतीचा प्लान सातशे रुपये असणार आहे, तर प्रिमिअम प्लान १० हजार रुपये इतका आहे. जिओ गीगाफायबरच्या ग्राहकांना देशभरात मोफत कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

 

फर्स्ट डे फर्स्ट शो

जिओच्या प्रिमीअम ग्राहकांना रिलीज होणाऱ्या प्रत्येक सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला मिळणार आहे. वेलकम ऑफरमध्ये संपूर्ण वर्षभरासाठी एकत्र प्लान निवडणाऱ्या ग्राहकांना एलईडी टीव्ही आणि सेट ऑफ बॉक्स मोफत मिळणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@