झाकीर नाईकला भारताच्या ताब्यात द्या : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2019
Total Views |




नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांची भेट घेतली. रशियात सुरु असलेल्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या (ईईएफ) पाचव्या बैठकीच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी मलेशियाच्या पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर निर्णयावर चर्चा करत वादग्रस्त भारतीय इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी महाथिर आणि पंतप्रधान मोदी यांच्या बैठकी विषयी माहिती देताना सांगितले,"पंतप्रधान मोदी यांनी झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी या मुद्द्याचे महत्व लक्षात घेता दोन्ही पक्षांकडून याबाबत अधिकारी कायम संपर्कात राहतील असे ठरविण्यात आले.


झाकीर नाईक हा वादग्रस्त मुस्लिम उपदेशक आहे. याने दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून वादग्रस्त विधाने करणारे उपदेश प्रसारित केले. २०१९ मध्ये भारत सोडून तो मुस्लिम बहुल असणाऱ्या मलेशियात स्थायिक झाला. मलेशियात याला कायमस्वरूपी राहण्याची परवानगी होती. परंतु ऑगस्ट महिन्यात मलेशियातील हिंदू धर्मीय आणि चिनी नागरिकांवर त्याने केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर त्याच्यावर देशातीलकोणत्याही सार्वजनिक उपक्रमात सहभाग घेण्यावर बंदी घालण्यात आली.


यानंतर पंतप्रधान मोदी आणि महाथिर यांच्यात जम्मू-काश्मीरशी संबंधित घडामोडींविषयी आणि
पुनर्रचनायाविषयीही चर्चा झाली. दहशतवादाच्या वाढत्या धोक्यावरही ते बोलले. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि त्याच्या वाढत्या धोक्यावर चर्चा केली. "दहशतवाद ही जागतिक समस्या आहे आणि मलेशिया सर्व प्रकारच्या दहशतवादाविरूद्ध आहे"असे पंतप्रधान महाथिर यांनी मान्य केले.

@@AUTHORINFO_V1@@