'लोकल' पुन्हा रुळावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2019
Total Views |



मुंबई : १८ तासांच्या खोळंब्यानंतर मुंबई लोकल पुन्हा एकदा धावू लागली आहे. पहिली रेल्वे सीएसटी स्थानकातून ४:३३ वाजता सीएसटी ते कसारा लोकल निघाली. चर्चगेटवरून विरारला जाणारी लोकल पहाटे ४:३६ वाजता विरारच्या दिशेने रवणा झाली. त्यानंतर लागोपाठ मध्य रेल्वेवरून ५ लोकल गाड्या सकाळी ५.१५पर्यंत धावू लागल्या होत्या. पश्चिम रेल्वेमार्गावर ८ लोकल धावू लागल्या आहेत. विरार, बोरीवली, डहाणूच्या दिशेने जाणऱ्या धीमी व जलदगतीने धावणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकल चालू आहेत.

 

कर्जत, अंबरनाथ, टिटवाळा अशा स्थानकांतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने साधारणतः १२ गाड्या निघाल्या आहेत. मध्य रेल्वेवरून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी पहिली लोकल उशिराने धावली. चर्चगेट हून मुंबई उपनगराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल निघाल्या आहेत. बहुतांश रेल्वे उशिराने धावत आहेत. विरार, नालासोपाराहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल निघाल्या आहेत. त्यापैकी बहुतांश लोकल धीम्या गतीने धावत आहेत.

 

सीएसटीएमहून पनवेलच्या दिशेने जाणारी ४:३२ ची लोकल साधारणतः ४५ मिनिटे उशिराने धावत आहे. पनवेलहून सीएसटीएमच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ४:०३ मिनिटाने सुटली. त्यानंतर ७ ते ८ लोकल सीएसटीएमच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. दरम्यान, राज्यभरात अनेक ठिकाणी पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे ठाण्यासह कोकणातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आपआपल्या जिल्ह्यांमधील पावसाची परिस्थिती पाहून शाळांच्या सुटीबाबतचा निर्णय घ्यावा, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@