मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा कहर ; रेड अलर्ट जारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2019
Total Views |



मुंबई : सलग २ दिवस चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. येत्या २४ तासात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, मुंबईत रेड अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. पावसाची स्थिती लक्षात घेता मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. तसेच सकाळच्या सत्रातील शाळेतले विद्यार्थी सुखरुप घरी पोहोचतील याची खबरदारी शाळांनी घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

 

मिठी नदीची वाढतेय पातळी

 

मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. तसेच, मिठी नदीच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे कुरळमध्ये पूरस्थिती ओढवली आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांती नगर पाण्याखाली गेले असून, एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य हाती घेतले आहे. आतापर्यंत १४०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

 

मुंबईची लाईफलाईन पुन्हा पाण्यात

 

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले. त्यामुळे मध्य रेल्वेवरील ठाणे-मुंबई सीएसएमटी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा दरम्यानची वाहतूक सुरू आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच पश्चिम रेल्वे फास्ट ट्रॅकवरून स्लो ट्रॅकवर उशिराने धावत आहे. हार्बर लाईन पूर्णपणे बंद असून तिन्ही मार्गावरील प्रवाशांना चांगलाच मनस्ताप होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@