भारत-रशियाचे संबंध अधिक दृढ : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2019
Total Views |

 
 

व्लादिवोस्तोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. रशियातील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराने मोदींना सन्मानित करण्यात येणार आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. या दरम्यान वार्षित ईस्टर्न इकोनॉमिक फोरममध्येही सहभागी झाले.

 

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले, "मला इथे येऊन आनंद झाला. राष्ट्रपती पुतीन यांच्या निमंत्रणामुळे व्लादिवोस्तोक येथे येणारा पहिला भारतीय पंतप्रधान आहे. पुतीन आणि माझ्या उपस्थितीत भारत आणि रशियाचे २० वे वार्षिक समिट पार पडत आहे." २००१ रोजी झालेल्या समिटमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी सहभागी झाले होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "पुतीन आणि मी दोन्ही देशांचे संबंध अधिक सुदृढ करण्यावर भर देऊ. भारतीय संरक्षण क्षेत्रातील उपकरणांचे सुटे भाग निर्मिती करण्याबद्दलही करार झाला आहे. भारतातर्फे रशियाच्या निमंत्रणानंतर या दौऱ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही देशांत व्यापारासह पर्यटन, कोळसा, हिरे आदी क्षेत्रांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत."

आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वी सुदूर क्षेत्राची यात्रा करणार आहेत, असे करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. ज्वेदा यार्ड जाण्यापूर्वी पुतीन आणि मोदी यांनी प्रदीर्घ चर्चा केली. परदेशी मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी ट्विट करत मोदी आणि पुतीन यांच्या चर्चेबद्दल माहिती दिली आहे. भारत आणि रशियाचे संबंध अधिक दृढ होत आहेत, असे ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@