मुंबईत सलग दुसऱ्यादिवशी पाणीबाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2019
Total Views |


 


मुंबई : गणपतींचे आगमन झाल्यानंतर वरुणराजानेही पुन्हा एकदा जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. मंगळवारपासून चालू असलेल्या पावसामुळे मुंबईमध्ये पुन्हा एकदा बिकट स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विरार रेल्वे स्थानकामध्ये पाणी साठल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

 

जोरदार पावसामुळे मुंबईतल्या हिंदमाता, दादर, सायनच्या सखल भागात पाणी साले असून चाकरमान्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, येत्या २४ तासात मुंबईसह कोकणासह महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच, नवी मुंबई , पनवेल भागात रात्रीपासून जोरदार पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागला. मुसळधार पावसामुळे कोपरखैरणे, नेरूळ, कळंबोली येथील महामार्गावर असणाऱ्या सबवेमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना त्यातून वाट काढत जावी लागत आहे.

 

केरळमध्ये पडणार्‍या मुसळधार पावसाचा परिणाम कोकण रेल्वे वाहतुकीवर झाला होता.त्यामुळे बऱ्याच गाड्या उशिराने धावत होत्या.त्यात कोकण रेल्वे मार्गावरील करंजाडी स्थानकानजीक मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूतील वाहतूक बंद झाली होती.याचा थेट परिणाम रत्नागिरी दादर पॅसेंजर वर झाला.दादर रत्नागिरी पॅसेंजर मंगळवारी रात्री १०.२० वाजल्यापासून तीन तास करंजाडी स्थानकात उभी होती.यामुळे ती उशिराने खेड स्थानकात पोहचली.ठप्प झालेली वाहतूक तीन तासाने पूर्वरत करण्यात आली.

 
@@AUTHORINFO_V1@@