हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2019
Total Views |




नवी दिल्ली : दहशतवादाला मुळासकट उखडून टाकण्यासाठी लागू करण्यात आलेल्या 'बेकायदा कारवाई प्रतिबंध' (यूएपीए) कायद्यांतर्गत भारताने एकूण चार दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहर पहिल्या क्रमांकावर आहे. तर, दहशतवादी संघटना 'जमात उद-दावा'चा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आदींचा सामावेश आहे.

 

या तीन नावांसह दहशतवादी जकी-उर लख्वीचाही या यादीत समावेश आहे. 'यूएपीए' म्हणजेच बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा नुकताच संसदेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, मसूद अजहर आणि हाफिज सईद या दोघांना संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. एखादी व्यक्ती दहशतवादी कारवाया करत असेल किंवा त्यात सहभागी असल्यास त्या व्यक्तीला दहशतवादी करता येऊ शकते, असे यूएपीए कायद्याने ठरवता येऊ शकणार आहे.

 

२००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना हे विधेयक आणले होते. २००८ मध्ये या विधेयकात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर २०१३ साली या विधेयकात पुन्हा सुधारणा करण्यात आली. या कायद्यानुसार, जर एखादी व्यक्ती दहशतवाद पसरवण्यासाठी मदत करीत असेल, पैसे पुरवत असेल, दहशतवादी साहित्य पुरवत असल्यास त्या व्यक्तीलाही दहशतवादी ठरवता येणार आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@