राकेश कुमार सिंह भदौरिया बनले २६ वे वायुदलप्रमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली :  राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सोमवारी वायुदलप्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली. भदोरिया हे वायुसेनेचे २६ वे प्रमुख बनले. माजी वायुदल प्रमुख बीएस धनोआ यांचे स्थान त्यांनी घेतले. आपल्या पदाचा कारभार सांभाळल्यानंतर लगेचच त्यांनी चीन आणि पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. राफेलमुळे शत्रुसमोर आपले पारडे आणखी जड होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.


 

 

 

ते म्हणाले, "वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमान सामाविष्ठ झाल्यानंतर आपल्यासाठी एक महत्वपूर्ण ताकद असेल." बालाकोट हवाई हल्ल्यासारख्या हवाईहल्ल्यासाठी आपण तयार आहोत का ?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी आपण तेव्हाही तयार होतो, आजही आहोत आणि पुढेही राहू, असे मत त्यांनी व्यक्त केले.

@@AUTHORINFO_V1@@