पवारांपुढे पेच : उमेदवारी मिळूनही नमिता मुंदडा भाजपात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |


मुंबई : बीडच्या राजकीय वर्तूळात मोठ्या घडामोडी होण्याच्या शक्यता गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केल्या जात आहेत. पंकजा मुंडे यांनी महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी थेट शरद पवारांना आव्हान दिले होते. त्यामुळे बीड मतदार संघात राष्ट्रवादीने आपली ताकद लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. यात प्रामुख्याने उमेदवारी मिळाल्यानंतरही नमिता मुंदडा या भाजपमध्ये गेल्याने आणखी एक धक्का पवारांना बसला आहे.



 

 

काही दिवसांपूर्वी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवबंधन बांधले होते. आता पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत नमिता मुंदडा या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान उमेदवारी मिळाल्यानंतरही मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.




 

 

स्व. डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांनी गेली २५ वर्षे लोकांच्या हितासाठी पूर्ण आयुष्य दिले, मतदारसंघातील प्रत्येकाशी कौटुंबिक नाते निर्माण करून थेट संपर्क ठेवला. पण मार्च २०१२ मध्ये ताई आपल्यामधून अचानक निघून गेल्या. मागील सात वर्षांपासून आमच्या संपूर्ण कुटुंबाने कुठलेही पद नसताना लोकांच्या हितासाठी काम सुरू ठेवले. हेच नाते आता मला पुढे कायम ठेवून, मतदारसंघाचा विकास करायचा आहे, येत्या विधानसभेसाठी मी उभी राहणार आहे. आपला आशिर्वाद असावा, ही नम्र विनंती,” अशी पोस्ट नमिता मुंदडा यांनी केली होती. मात्र, यावर शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या अन्य कोणत्याही नेत्याचा फोटो किंवा उल्लेखही नव्हता. यामुळेच अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. अखेर त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

@@AUTHORINFO_V1@@