कांद्याची निर्यात नेमकी का थांबली ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |




लासलगाव : कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने पुढील आदेश होईपर्यंत कांद्याच्या निर्यात धोरणात सुधारणा केली आहे.सरकारने कांद्याच्या सर्व जातींच्या निर्यातीवर त्वरित परिणाम म्हणून बंदी घातली आहे.

 

कांद्याचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याची निर्यात थांबविली आहे.देशभरात सध्या कांद्याचे भाव खूप वाढले आहेत.कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ होऊन त्याचा सर्वसामान्य नागरिकांवर प्रभाव पडत आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात तात्काळ प्रभावाने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय अन्न व नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी सरकारकडे कांद्याचा पुरेसा साठा(बफर स्टॉक) आहे.

 

विविध राज्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे कांद्याचा पुरवठा केला जात असून किमतीही नियंत्रणात येत असल्याचे सांगितले होते. किरकोळ बाजारात कांद्याच्या दराने साठी ओलांडली आहे. गेल्या एक महिन्यांपासून कांदा दरामध्ये दररोज वाढ होत आहे. शनिवारी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव झाले. तेव्हा उन्हाळ कांद्याला कमीत कमी ११०० सरासरी ३६०० जास्तीत जास्त ३८८० रुपये भाव मिळाले होते.

 

निर्यातबंदीचा शेतकर्‍यांना बसणार फटका....

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचा शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे याचे कारण म्हणजे कांदा निर्यात बंदीचा थेट परिणाम शेतकरी आणि कांदा उत्पादकांवर होणार आहे. यापूर्वीच सरकारने निर्यात मुल्यात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकर्‍यांना बसला होता.आता निर्यातच बंद केल्याने शेतकर्‍यांना मिळणारा कांद्याचा भाव कोसळणार आहे.या निर्यात बंदीचा परिणाम आगामी होणार्‍या विधानसभा निवडणुकीवर देखील होणार आहे


- संतोष गोरडे,
कांदा उत्पादक शेतकरी

@@AUTHORINFO_V1@@