व्हीडिओ : कृष्णविवरात चक्काचूर झाला तारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |


वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था असलेल्या नासाने एका व्हीडिओद्वारे जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सुर्याहून साठ लाखपटीने जास्त वजनी तारा कृष्णविवरात गेल्यावर चक्काचूर झाल्याचा दावा नासाने केला आहे. या ताऱ्याला कृष्णविवराने आपल्या कक्षेत खेचून घेत त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. वैज्ञानिकांच्या मते, या घटनेला ब्रम्हांडीय बदल म्हणतात. Cosmic Cataclysm च्या विघटनामुळे ज्वारीय विघटन ( Tidal Disruption) होते. या विनाशकारी दृश्याला नासाच्या उपग्रहाद्वारे टीपण्यात आले आहे.

 

आत्तापर्यंत अशा ४० घटना घडल्या आहेत. १० हजार ते १ लाख वर्षांमध्ये ब्रम्हांडात अशा ज्वारीय विघटन झाल्यामुळे अशा घटना घडतात. ट्रान्झिस्टींग एक्सोप्लॅनेट सर्वे सॅटेलाईट (टीईएसएस) या उपग्रहाच्या माध्यमातून टीपण्यात आलेल्या या घटनेला ऑल स्काई ऑटोमेटेड सर्वे फॉर सुपरनोवा 'ASAS-SN-19BT', असे नाव देण्यात आले आहे. या प्रकरणाचे अभ्यासक थॉमस होलोइन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना टीपण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. याचा अभ्यास करण्यासाठी मिळालेली आकडेवारी महत्वाची ठरणार आहेत.

 

सुर्यापेक्षा मोठा होता 'तो' तारा

एस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, कृष्णविवर '2MASX-J-07001137-6602251', आकाशगंगेच्या मध्ये आहे. आपल्या आकाशगंगेपासून ते ३७.५० कोटी प्रकाशवर्ष दूर आहे. या तुटलेल्या ताऱ्याचा आकार सुर्याएवढा आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@