आजाराचे विश्लेषण भाग-४

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |



शारीरिक व मानसिक विशेष लक्षणे ही रुग्णाचे औषध शोधण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरतात. या विशेष लक्षणांमुळेच मग रुग्णाचे वैयक्तिकीकरण करता येते. या लक्षणांमुळे आजाराच्या पद्धतीचा अंदाज येतो. या लक्षणांमुळे रोगाचे निदान करणे सोपे जाते.


डॉ. केंट यांनी आजाराचे वर्गीकरण करताना अतिशय सूत्रबद्ध रितीने या लक्षणांचे वर्गीकरण केले आहे. विशेष लक्षणे ही मानसिक व शारीरिक अशा दोन भागांमध्ये वर्गीकृत केलेली असतात. मानसिक लक्षणे ही प्रत्येक व्यक्तिमत्त्वाची वैयक्तिक लक्षणे असतात. कुठल्याही प्रसंगात प्रत्येक व्यक्तीची व्यक्त होण्याची पद्धत ही वेगवेगळी असते व त्यामुळेच ही लक्षणे त्या व्यक्तीचे विशेष गुणधर्म दाखवतात. म्हणूनच या लक्षणांचे वर्गीकरण करत असताना उच्च मानली जातात. या मानसिक लक्षणांमध्येसुद्धा मग उच्च, मध्यम आणि कनिष्ठ दर्जाची मानसिक लक्षणे असतात. इच्छाशक्ती व विविध भावनांची लक्षणे (Will and Emotions) ही उच्च दर्जाची लक्षणे मानली जातात. यामध्ये विविध प्रकारच्या भावनांचा समावेश होतो. उदा. प्रेम, आकस, भय, आनंद, लोभ, मत्सर याशिवाय लैंगिकता, काही विशिष्ट सवयी इ. अनेक लक्षणांचा समावेश होतो. मानसिक गोंधळ, भास व आकलन शक्तीशी निगडित लक्षणे ही मध्यम दर्जाची लक्षणे मानली जातात, तर बुद्धीशी निगडित लक्षणे जशी एकाग्रता, विसरभोळेपणा इ. लक्षणे ही कनिष्ठ दर्जाची मानली जातात.

 

शारीरिक विशेष लक्षणांमध्ये

 

) शारीरिक आवड व नावड दाखवणारी लक्षणे.

लैंगिक आरोग्यात येणारे अडथळे

भूक लागणे / न लागणे

खाण्याच्या विशिष्ट सवयी व आवडी-निवडी

पाण्याची तहान

 

) बाहेरील वातावरणाचा किंवा बाह्य प्रेरणेचा शरीरावर होणारा परिणाम, जसे - गरम व थंड वातावरणात शरीरात होणारे बदल.

 

ओलसर-दमट वातावरण, वादळी हवा, हिमवृष्टी इत्यादींचा शरीरावर होणारा परिणाम.

विविध ऋतू तसेच दाब, धक्का, भिजणे.

उत्सर्जन क्रियेत येणारे अडथळे व त्यासदृश्य लक्षणे.

खाण्याच्या वस्तू वा वातावरणातील वस्तूंमुळे होणारी अतिसंवेदनशीलता किंवा अ‍ॅलर्जी.

शरीराचा कुठला भाग प्रभावित झाला आहे, ते पाहणे.

विशेष लक्षणे, जशी आग होणे, थरथरणे, कंप पावणे, थंडावा येणे इ. वैयक्तिक लक्षणे.

 

 
 

ज्ञानेन्द्रियांच्या निगडित असलेली काही विशेष लक्षणे या सर्वांचा अंतर्भाव हा शारीरिक विशेष लक्षणांमध्ये होत असतो. शारीरिक व मानसिक विशेष लक्षणे ही रुग्णाचे औषध शोधण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरतात. या विशेष लक्षणांमुळेच मग रुग्णाचे वैयक्तिकीकरण करता येते. या लक्षणांमुळे आजाराच्या पद्धतीचा अंदाज येतो. या लक्षणांमुळे रोगाचे निदान करणे सोपे जाते. पुढील भागामध्ये आपण सामान्य लक्षणे व अवयवांची लक्षणे याबद्दल विस्ताराने माहिती घेऊया.

 

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@