नेतेमंडळी बाप्पा चरणी लीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2019
Total Views |

संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. असाच जल्लोष महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या घरीही पाहायला मिळाला. यंदाच्या वर्षी सर्वाधिक आकर्षणाचा विषय ठरला तो म्हणजे खासदार पूनम महाजन यांच्या घरी विराजमान झालेले पर्यावरण पूरक गणपती बाप्पा. पूनम महाजन यांनी आपल्या निवासस्थानी कागदापासून बनवलेल्या गणेशमूर्तीची विधिवत  स्थापना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
विघ्नहर्त्यांचे आगमन...वर्षा निवासस्थानी काल सकाळी गणरायाचे पूजन करून प्रतिष्ठापना केली.



ऍड.आशिष शेलार
यांनी वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेश मंडळात श्री गणेशाची स्थापना केली. यंदाचे या मंडळाचे हे चोविसावे वर्ष आहे.



सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे  
 यांच्या निवास्थानी बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले. 'सुखकर्ता, दु:खहर्ता श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सुखसमृद्धी नांदते, दु:ख दूर होते. हा विघ्नहर्ता आपणा सर्वांच्याच मार्गातील अडथळे दूर करो, आपल्या सर्वांना बुद्धी-शक्ती-सिद्धी प्रदान करून सुख, शांती, समाधानाचे आयुष्य देवो, हीच गणरायाचरणी प्रार्थना' असा शब्दात महाराष्ट्रातील सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या



केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू 
यांनी सिंधुदुर्गमधील पूर्वजांच्या घरी पूजन गणेश स्थापना केली. पिढीजात चालत आलेल्या मालवणी पद्धतीने गणेशपूजा केली.






सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही आपल्या निवासस्थानी गणेशाची स्थापना केली. आरतीच्या वेळी सर्व कुटुंबीय एकत्र येऊन मनोभावे गणेशाचे पूजन करतात, संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन सण साजरा करणे आनंदाची गोष्ट असल्याचे ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@