शेअर बाजार गडगडला : सेन्सेक्समध्ये आठशे अंकांची घसरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2019
Total Views |




मुंबई : जागतिक शेअर बाजारातील पडसाद आणि जीडीपीची घसरलेली आकडेवारी याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे मंगळवारी शेअर बाजारावर उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दुपारी ३.१५ वाजताच्या दरम्यान आठशे अंकांनी कोसळला. दिवसअखेर तो ७६९ अंशांनी घसरून ३६ हजार ५६२.९१ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२५ अंशांनी घसरून १० हजार ७९७ वर बंद झाला.

 

शुक्रवारी शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स २६३ अंशांच्या वाढीसह ३७ हजार ३३२ च्या पातळीवर बंद झाला होता. निफ्टीही ७४.९५ अंशांच्या वाढीसह ११ हजार २३च्या स्तरावर बंद झाला. वित्तीय आणि वाहन कंपन्यांच्या शेअरमध्ये झपाट्याने विक्री नोंदवण्यात आली.

 

सेन्सेक्समध्ये टेक महिंद्रा, एचसीएल टेक या शेअरमध्ये खरेदी दिसून आली. या व्यतिरिक्त इतर सर्व शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. यात टीसीएस, इन्फोसिस, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, मारुति, आयटीसी, पावरग्रीड, एशियन पेंट्स, सनफॉर्मा, महिंद्रा एण्ड महिंद्रा, ओएनजीसी, एनटीपीसी, रिलायन्स, आयसीआयसीआय बॅंक, टाटा मोटार्स, एचडीएफसी, टाटा स्टील आदी कंपन्यांचा सामावेश आहे.

@@AUTHORINFO_V1@@