मिताली राजचा टी-२०मधून निवृत्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2019
Total Views |


 


मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची रनमशीन म्हणून ओळखली जाणारी मिताली राजने आता टी-२०मधून निवृत्ती घेतली. ३६ वर्षीय मिताली आता एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष देणार आहे. तिने ३२ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-२० विश्वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे.

 
 
 

मिताली राजने २०१२, २०१४ आणि २०१६ च्या टी -२० विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ८८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मितालीने २३६४ धावा केल्या आहेत. या धावा करताना ३७.५२ची तिची सरासरी राहिली आहे. या धावांमध्ये मितालीच्या १७ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांच्याही आधी मितालीने २ हजार धावांचा टप्पा पार केला होता. भारतातर्फे टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या मितालीच्याच नावावर आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@