उरणमध्ये गॅस प्लांटला आग : पाच जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2019
Total Views |


 


पनवेल : ओएनजीसीच्या (ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन) उरण येथील गॅस प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे. या आगीत आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास आगीचा भडका उडाला, त्यानंतर जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिली.

 

रायगड जिल्ह्यात उरण शहरानजीक हा ओएनजीसी गॅस् प्लँट आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता प्लँटमध्ये आगीचा भडका उडला. ओएनजीसी प्लँटच्या सीएफयू दोन या भागात द्रवगळतीने आग लागल्याचा प्रार्थमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा सामावेश आहे. आग लागल्यानंतर जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) आणि ओएनजीसीच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

 

ओएनजीसी, जेएनपीटी यासह नजीकच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीच्या ठिकाणी काही अडकलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. परिसरात धूराचे लोळ पसरले असून गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे. ग्रामस्थांना इतर ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे.

@@AUTHORINFO_V1@@