अभिमानास्पद ! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मिळाला 'हा' सन्मान !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : जगातील सर्वात आश्चर्यकारक स्थानकांच्या यादीत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकाला दुसरे स्थान मिळाले आहे. 'वंडरलिस्ट' या संकेतस्थळाने जगातील दहा आश्चर्यकारक स्थानकांची यादी जाहिर केली आहे.

पहिल्या स्थानी न्यूयॉर्क येथील ग्रॅण्ड सेंट्रल टर्मिनल आहे, तर दुसऱ्या स्थानावर भारतातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळालेले एकमेव स्थानक होण्याचा मानही यापूर्वी सीएसएमटी स्थानकाला मिळाला होता. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना, अशी या स्थानकाची ओळख आहे. फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी व्हिक्टोरियन गॉथिक आर्किटेक्चर आणि मुघल स्थापत्यशास्त्रानुसार याची निर्मिती केली होती. १८८८ साली निर्मिती पूर्ण झालेल्या या स्थानकाला पूर्वी व्हिक्टोरीया टर्मिनस म्हणून ओळखले जायचे.

तिसऱ्या स्थानी लंडन येथील सेंट प्रॅक्रास इंटरनॅशनल तिसऱ्या स्थानी, मॅड्रीडचे अटोचा स्थानक चौथे तर, एन्टवर्पचे एन्टवर्प सेंट्रल पाचव्या स्थानी, पॅरिसचे गरे दू नॉर्ड सहाव्या, इस्तानाबुल सीकरेसी स्थानक, मापुटो येथील सीएफएम रेल्वे स्थानक आठव्या, कानझावातील कानझावा स्थानक, मलेशियातील क्वालालंपूर रेल्वे स्थानक दहाव्या स्थानावर आहे.

@@AUTHORINFO_V1@@