...‘ती’ वेळ अखेर आली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2019
Total Views |




नवी दिल्ली
: “जम्मू-काश्मीरचा इतिहास आत्तापर्यंत तोडून-मोडून देशासमोर ठेवण्यात आला आहे. कारण ज्या लोकांची चूक होती, त्यांनी हा इतिहास लिहिला. स्वत:ची चूक झाकण्यासाठीच चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला गेला. मात्र आता खरा इतिहास उघड करण्याची वेळ आली असून जनतेसमोर तो लवकरच मांडला जाईल,” असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केले.


निवृत्त शासकीय अधिकारी संघटनेच्या वतीने नवी दिल्लीत पार पडलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी काश्मीरच्या विषयाला हात घातला
. ते म्हणाले, “कलम ३७० हटविण्यासाठी भाजप आणि अन्य पक्ष खूप वर्षांपासून संघर्ष करत होते. आम्ही फक्त बोलतच नाही तर वारंवार यासाठी आंदोलन केले. जोपर्यंत कलम ३७० हटविला नाही तोवर वेगवेगळे ११ आंदोलन करण्यात आले, ” असे ते म्हणाले.


आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवरही कडाडून टीका केली
. ते म्हणाले, “जे आमच्यावर आरोप लावतात की, राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतला गेला, त्यांना हे स्पष्ट करतो की, जेव्हा आमचा पक्ष उदयास आला तेव्हापासून आमचे उद्दिष्ट कलम ३७० हटविणे हे होते. भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्याची मुख्य भूमिका काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबत असे घडले नाही की, देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरविली जाईल. तेव्हा ठरले होते की, भारत ६३१ खंडांमध्ये विभागला जाईल. त्यावेळी ब्रिटन संसदेत एक प्रस्ताव पास झाला असता तर ६३० संस्थाने भारतात विलीन झाली असती. मात्र तसे होऊ शकले नाही. त्यासाठी प्रयत्न केले गेले नाही. विचारविनिमय केला नाही, चर्चा घडली नाही,” असे अमित शाह यांनी सांगितले.


युद्धविराम का
?

“ज्यावेळी आपले सैन्य युद्धात जिंकत होते, त्यावेळी युद्धविरामाचे आदेश का दिले गेले? त्यावेळी युद्ध थांबविण्याची काय गरज होती? यूएनमध्ये जाण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा वैयक्तिक होता. नेहरूंची ही चूक हिमालयाहून मोठी होती. हा दोन्ही देशांमधला वाद होता, “ असे ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@