स्त्री सन्मानासाठी 'भारत कि लक्ष्मी' अभियान : पं. नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2019
Total Views |




नवी दिल्ली
: आज नरेंद्र मोदी यांनी मन कि बात मधून जनतेशी संवाद साधला. स्त्री जन्माचे स्वागत करणाऱ्या आणि महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावे याकरिता मोदी सरकारने कायमच नवीन नवीन अभियान सुरु केले. 'सेल्फी विथ डॉटर' त्यापैकीच एक. याच धर्तीवर मोदींनी येत्या दिवाळीला 'भारत कि लक्ष्मी' हे विशेष अभियानाची चालवण्याचे आवाहन केले. आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाचे आणि देशाचे नाव उज्वल करणाऱ्या मुलींचा सन्मान करावा याकरिता हे अभियान असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी मन कि बात मधून दिली.


या सर्व महिला आणि मुलींचा
, घरातील लक्ष्मीचा गौरव या दिवाळीला करूयात असे म्हणत, #भारत कि लक्ष्मी हा हॅशटॅग वापरत आपल्या कुटुंबातील मुलीसोबत फोटो अपलोड करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. तसेच सर्व देशवासियांना दसरा व दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.


मोदी सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरु झाल्यापासून मोदींचा हा चौथा
'मन कि बात' संवाद होता. नशामुक्ती, प्लास्टिकमुक्ती यांसारख्या गोष्टींवर चर्चा केली. विशेष म्हणजे आजच्या त्यांच्या कार्यक्रमात लता दीदी म्हणजेच लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी त्यांच्याशी झालेल्या संवादाची ध्वनिफीतही ऐकवली.

@@AUTHORINFO_V1@@