'संघ आणि भारत एकच हा संदेश जगभरात पोहोचवल्याबद्दल इम्रान खान यांचे आभार'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2019
Total Views |



सहसरकार्यवाह डॉकृष्णगोपाळ शर्मा यांचे पाकिस्तानला प्रत्युत्तर


नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्र संघातील परिषदेदरम्यान भारतासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करणार्‍या पाकिस्तानला शनिवारी संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाळ शर्मा यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले


ते म्हणाले, “इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा संपूर्ण जगासमोर जो प्रसार केला त्याबद्दल त्यांचे आभार. रा. स्व. संघ फक्त भारतात आहे. जगात इतर ठिकाणी कोठेही संघाच्या शाखा नाहीत. मात्र संयुक्त राष्ट्र संघातील परिषदेत आपल्या भाषणात इम्रान यांनी अनेकवेळा उल्लेख केल्याने संघाला जगभरात चांगलीच प्रसिद्धी मिळाली असून याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो,”असे ते म्हणाले.

 

पाकिस्तानच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले, “पाकिस्तान आमच्यावर का रागावला आहे, हे आम्हाला माहित नाही. मात्र संघावर त्यांचा राग असेल तर याचा अर्थ तो भारतावर रागावला आहे. म्हणजेच त्यांच्या म्हणण्यानुसार रा.स्व.संघ आणि भारत हे आता एकच आहेत. हेच नेमके आम्हालाही हवे होते. भारत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकच आहे, दोन नाहीत. हे जगासमोर त्यांनीच दाखवून देत इम्रान खान यांनी हे फार चांगले काम केले आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. ते आमच्या नावाचा जगभरात प्रसार करत आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार, असे त्यांनी यावेळी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@