पाकच्या आरोपांना 'यांनी' युएनमध्येच दिले सडेतोड उत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर अनेक खोटे आरोप केले. यावेळी पुन्हा एकदा काश्मिरी मुस्लिमांवर अत्याचार होता आहेत, असा सूर पुन्हा एकदा लावला आला. यावर संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.

 
 
 

"पाकिस्ताने संयु्क्त राष्ट्राच्या मंचाचा दुरूपयोग केला असून संयुक्त राष्ट्र संघाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्यावर पुर्वीपासून अत्याचार होत आले असून आजही परिस्थिती कायम आहे. इम्रान खान यांनी काश्मीरसंबधी जे काही सांगितले आहे. ते सर्व खोटे असून त्यांनी भडकाऊ विधाने केली. पाकिस्तानने ओसामा बेन लादेनचे खुलेपने समर्थन केले होते. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना पेन्शन देत आहे. ही बाब पाकिस्तान स्विकारेल का?" असा सवाल विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानला विचारला.

 

"पाकिस्तान हे संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या ३० दहशतवादी आणि २५ दहशतवादी संघटनांचे घर आहे याची पुष्टी पंतप्रधान इम्रान खान देतील का?", असादेखील सवाल त्यांनी उपस्थित केला. भारताने राईट ऑफ रिप्लायचा वापर करून उत्तर पाकिस्तानच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे.

@@AUTHORINFO_V1@@