न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तान विरोधात निदर्शने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2019
Total Views |




न्यूयॉर्क
: शुक्रवारी मुताहिदा कौमी चळवळीने पाकिस्तानमधील मुहाजीरांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात  संताप व्यक्त करत संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७४व्या अधिवेशनात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषण दरम्यान ही निदर्शने करण्यात आली .


मुताहिदा कौमी चळवळी व्यतिरिक्त या आंदोलनात विविध शहरांमधील पुरुष
, महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात अल्ताफ हुसेन, तसेच मागील काही दिवसांत मारल्या गेलेल्या कार्यकर्त्यांचे फोटो घेऊन केंद्र सरकारकडून होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात झेंडे आणि घोषणा देऊन निदर्शने केली.


या दरम्यान
, मुताहिदा कौमी नेत्यांनी लोकांना उद्देशून सांगितले की, "पाकिस्तानात आमच्यावर मार्शल कायदा लादून आम्ही आणि इतर समाजांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या नरसंहार आणि क्रौर्याचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. आमच्यावर पाकिस्तानात मार्शल कायदा लागू करून राजकारणापासून दूर केले गेले आणि मागील ३ वर्षांपासून आमच्या कार्यालयांवर टाळे ठोकले आहे.


ते म्हणाले की
, कराची, हैदराबाद यांच्याबरोबर पश्तुन, सिंध आणि बलुचिस्तान ही शहरे सैन्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत. जेथे पाकिस्तानी लष्कराकडून नरसंहार होत आहे. विशेष म्हणजे बाहेर ही निदर्शने सुरु असताना, जनरल असेंब्लीमध्ये इम्रान खान काश्मीरमध्ये मानवी हक्कांसाठी खोटे ओरडत होते.

@@AUTHORINFO_V1@@