काश्मीरमध्ये लष्कर आणि संशयित दहशतवाद्यांमध्ये चकमक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2019
Total Views |



श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्यामध्ये संशयित दहशतवादी आणि लष्करामध्ये शनिवारी सकाळपासून चकमक सुरू आहे. एका खासगी वाहनाला बटोट - डोडा रस्त्यावर थांबवण्याचा प्रयत्न दोन सशंयित दहशतवाद्यांनी केला. चालकाने वाहन न थांबवता जवळील लष्कराच्या चौकीमध्ये ही माहिती दिली. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

 

शनिवारी सकाळी ७.३० वाजता २ संशयीत दहशतवाद्यांनी बटोट येथे एक खासगी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता शिघ्र कृतीदलाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर जवानांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. दरम्यान चहूबाजूंनी वेढले गेल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, अशी माहिती भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@