साईसेवेचा अद्भुत लेखाजोखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2019   
Total Views |




पुस्तकात साई संस्थानची,
संस्थानने केलेल्या कामांची सविस्तर-सचित्र माहिती दिली आहे. त्यामुळे हे पुस्तक आकर्षक ठरते. पुस्तकाची बांधणी, छपाई, मुखपृष्ठ, दर्जा अत्युत्तम असून आपल्या परिचितांना भेट देण्यासाठीही उत्तम ठरणारे आहे. खरे म्हणजे डॉ. हावरे यांनी हे पुस्तक लिहून सर्वच साईभक्तांना आनंदाची अनुभूती दिली आहे, असे हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच.



साधारण १००-१२५ वर्षांआधी महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याच्या शिर्डी गावात एक अवलिया होऊन गेला
, ज्यांना आपण सर्व ‘साईबाबा’ नावाने ओळखतो. साई प्रत्यक्षात शिर्डीमध्ये राहत होते, तेव्हा त्यांनी अनेकांना अध्यात्माची, मानवतेची आणि एकात्मतेची शिकवण दिली. ‘सबका मालिक एकहे ब्रीद घेऊन साईंनी सर्व चराचरात एकच ईश्वर असल्याचे सांगितले किंवा प्रत्येक धर्माच्या, पंथाच्या, संप्रदायाच्या विशिष्ट दैवताचे जे नाव घेतले जाते, तो सर्वांचा एकच आहे, असे आपल्या अनुयायांना पटवून दिले. पुढे साईबाबांनी समाधी घेतली आणि उत्तरोत्तर साईबाबांची व शिर्डीची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. गेल्या काही वर्षांत तर शिर्डी देशातील क्रमांक दोनचे सर्वच अर्थांनी युक्त असे तीर्थक्षेत्र म्हणून समोर आले. परंतु, तीर्थक्षेत्र म्हटले की, बर्‍याच ठिकाणी आपल्याला जे पाहायची इच्छा असते, तेच दिसेल, याची काही शाश्वती नसते. म्हणजे मंदिर परिसर टापटीप वगैरे ठेवला जातो, पण ते ठिकाण ज्या गावात असते त्याची अवस्था बिकट असल्याचे पाहायला मिळते. तसेच निर्माल्याची विल्हेवाटही व्यवस्थित लावलेली दिसत नाही. शिवाय प्रत्येक भक्ताला सुरळीतपणे दैवताचे दर्शन घेता येईल, असेही नाही. अशीच परिस्थिती शिर्डीचीही झाली, नंतर शासनाने साई मंदिर संस्थानची समितीही तयार केली. अध्यक्ष व अन्य सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, म्हणावे तसे काम काही झाले नाही. नंतर शिर्डी साई संस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अणुशास्त्रज्ञ, उद्योजक असलेल्या डॉ. सुरेश हावरे यांच्याकडे सोपवली.




डॉ
. हावरे संस्थानच्या अध्यक्षपदी आल्यापासून त्यांनी केवळ मंदिर, तेथील परिसरच नव्हे, तर शिर्डीचाही चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी पावले उचलली. आज आपण शिर्डीत गेलो, तर आपल्याला तेथील संपूर्ण व्यवस्थापनात, दर्शनपद्धतीत, निर्माल्य विल्हेवाटीत, प्रसाद वितरणात, आरोग्य सेवेत आमूलाग्र परिवर्तन झाल्याचे आणि शिर्डी गावासाठीही संस्थानने भरीव कार्य केल्याचे दिसते. मंदिर परिसराचा कायापालट, दर्शन रांगेतील सुधारणा, भक्तांच्या सोयी-सुविधांमध्ये झालेली वाढ, प्रसादालय, आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त रुग्णालय, आयटीआयमधील बदल व सुधारणा, साई नॉलेज पार्क अशाप्रकारची कामे डॉ. सुरेश हावरे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सुरू केली व त्याचे व्यवस्थापन ते आजही पाहत आहेत. सोबतच साईसेवक ही भक्तीचा अनोखा आविष्कार दाखवणारी पद्धतीही त्यांनी शिर्डीत सुरू केली. म्हणजेच भक्तांनी स्वतः साईमंदिरात, परिसरात आणि इतरांसाठी सेवा करायची. त्याचबरोबर तिरुपतीला केशदान, शिर्डीला रक्तदान या घोषणेसह रक्तदानाचा पवित्र यज्ञही मंदिरपरिसरात सुरू झाला. मंदिर म्हटले की, तिथे फुले, हार, पुष्पगुच्छ वगैरे मोठ्या प्रमाणावर अर्पण केले जाते, शिर्डीलाही तसेच होई. पण, अनेकदा देवाला एकदा अर्पण केलेल्या या वस्तूनंतर निर्माल्य म्हणून फेकून दिल्या जातात, कधी मोकळ्या जागेत तर कधी पाण्यात. डॉ. हावरेंनी मात्र अध्यक्षपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर निर्माल्यातून अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरू केले व त्यातून परिसरातील महिलांना रोजगारही मिळाला. हा उपक्रम नक्कीच नावीन्यपूर्ण व टाकाऊतून उपयुक्त काही निर्माण करणाराही होता.




सोबतच श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव
, स्वच्छ शिर्डी, साई पालखी सोहळा, शिवसृष्टी, साई पत्रिका संमेलन, जागतिक साईमंदिर विश्वस्त परिषद, विषमुक्त शेतीसाठी शेतकर्‍यांचे शिबीर असे अनेक उपक्रम, कार्यक्रम डॉ. हावरे यांनी शिर्डीत सुरू केले. साई होलोग्राफिक शो, ध्यानमंदिर, साईपादुका दर्शन, साईंच्या गुरुस्थानावरील निंबवृक्षाचे टिश्यूकल्चर, अखंड हरिनाम सप्ताह, श्री साईसच्चरित पारायण, समर्पण ध्यानयोग शिबीर, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत यासारख्या गोष्टीही डॉ. हावरे यांनी करुन दाखवल्या. आगामी काही काळात डॉ. हावरे यांच्या पुढाकाराने काम सुरू झालेल्या, दर्शन क्यु कॉम्प्लेक्स, १० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प, नवीन शैक्षणिक संकुल उभारणी, लाडू बुंदी प्रोसेसिंग युनिट, १० मेट्रिक टनाचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, साई आयएएस अकादमी आदी विविध योजना पूर्णत्वास जाणार आहेत. आपण शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी आल्यानंतर नेमके काय काम केले, याचे दस्तावेजीकरण व्हावे म्हणून हा सर्व लेखाजोखा खुद्द डॉ. सुरेश हावरे यांनीच मांडला आहे, आपल्या ‘साईसेवा - ए डिव्हाईन ब्लेसिंग’ या पुस्तकातून.



साईंची सेवा करण्याची संधी मिळाली हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा ईश्वरी आशीर्वाद आहे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. या काळात माझे आयुष्य पूर्णतः बदलून गेले. मी शिर्डीला कधी येत नव्हतो, पण या काळात शिर्डीशिवाय कुठे जात नव्हतो. साईबाबांचा पूर्ण कधी विचार करत नव्हतो. पण या काळात साईंशिवाय दुसरा कुठला विचार केला नाही. पावलांना कायम शिर्डीचीच ओढ असायची,” अशा शब्दांत डॉ. हावरे यांनी आपल्या शिर्डी व साईबाबांप्रति भावनाही व्यक्त केल्या आहेत. तसेच पुस्तकात साई संस्थानची, संस्थानने केलेल्या कामांची सविस्तर-सचित्र माहिती दिली आहे. त्यामुळे हे पुस्तक आकर्षक ठरते. पुस्तकाची बांधणी, छपाई, मुखपृष्ठ, दर्जा अत्युत्तम असून आपल्या परिचितांना भेट देण्यासाठीही उत्तम ठरणारे आहे. खरे म्हणजे डॉ. हावरे यांनी हे पुस्तक लिहून सर्वच साईभक्तांना आनंदाची अनुभूती दिली आहे, असे हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच.





पुस्तकाचे नाव : साईसेवा : ए डिव्हाईन ब्लेसिंग

लेखक : डॉ. सुरेश हावरे

संकल्पना आणि मांडणी: भगवान दातार

आवृत्ती : प्रथम

@@AUTHORINFO_V1@@