नवरात्रीत अखंड नंदादीपासाठी दीपशक्ती !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2019
Total Views |



आपल्या संस्कृतीत शक्तीच्या म्हणजेच देवीच्या आराधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत साजरी होणारी नवरात्र. या पूजेत महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे देवघरात किंवा उत्सवांमध्ये देवीच्या मूर्तीशेजारी नऊ रात्री अखंड तेवणारा तेलाचा दिवा






 

देवी हे शक्तीचं म्हणजेच ऊर्जेचं रूप आहे. त्यामुळेच या अखंड दिव्याच्या रूपानं साक्षात परमेश्वराचं अधिष्ठान पूजास्थानी लाभतं . त्यामुळेच कोणत्याही पूजेत दीपपूजन हा विधी प्रमुख असतो. दिवा हा प्रकाश देऊन अंधाराचा नाश करतो. प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक आहे, तर अंधार हे अज्ञानाचं . 'उजेडात होते पुण्य अंधारात पाप' ही गीताची ओळ सर्वांनाच माहीत असेल.

फक्त नवरात्रीतच नव्हे , तर दररोजच सकाळी आणि तिन्हीसांजेला घरातल्या देव्हाऱ्यात , तुळशीपाशी तेलाचा दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचं कवच तयार होतं . या सात्त्विक लहरींच्या कवचामुळे घरातील व्यक्तींचं वातावरणातल्या अनिष्ट, दुष्ट शक्तींच्या स्पंदनांपासून रक्षण होत.

दिव्याकरिता पूर्वीपासून तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. या तेलाच्या ज्योतीकडे उच्चंदेवतांची स्पंदनं आकृष्ट होतात आणि त्यातून प्रक्षेपित लहरींमध्ये तेज तत्त्वाचं प्रमाण अधिक असत असं शास्त्र सांगतं . साडेसाती, अंतर्दशा, महादशा, या काळात तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव संतुष्ट होऊन ग्रहदोष नाहीसे होतात. व शांती लाभते.






 

तीळ तेलाचं हे महत्त्व लक्षात घेऊन पितांबरीनं दीपशक्ती तेलाची निर्मिती केली आहे. खास दिव्याकरिता तीळ तेल उपलब्ध केल्यामुळे त्याची किंमतही सर्वांना परवडेल अशी झाली आहे. दीपशक्ती तेलाच्या दिव्यामुळे धूर कमी होतो आणि ज्योत दीर्घकाळ शांतपणे तेवत राहते. तसेच दीपशक्ती तेल आल्हाददायक सुगंधाने युक्त आहे. दीपशक्ती तेलाने वातावरणात सात्त्विकता वाढते. आणि मनाला शांती मिळते. आध्यात्मिक भावजागृती होऊन एकाग्रता वाढते व कृतज्ञता व्यक्त होते, जी ईश्वरराधनेसाठी पूरक ठरते. अशा पितांबरी दीपशक्ती तेलाने नवरात्रीच्या काळात अखंड दीप तेवता ठेवू या. देवीच्या भक्तीतून शक्ती आणि दिव्याच्या प्रकाशातून शांती मिळवू या!

@@AUTHORINFO_V1@@