पाकिस्तानचं शतखंडित राष्ट्रीयत्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



पाकिस्तान निर्माण होऊन आता ७२ वर्षं उलटली
. प्रशासन आणि लष्कर यांवरची पंजाब्यांची पकड काही सुटत नाही. त्यामुळेच बलुची, पठाण, सिंधी सगळ्यांनाच स्वतंत्र व्हायचंय आणि त्यामुळेच त्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरतोय.


महाभारतात किरात आणि अर्जुन यांच्या युद्धाची कथा आहे. तीर्थयात्रा फिरत असलेल्या अर्जुनाला एक महावराह - खूप मोठा रानडुक्कर दिसतो. अर्जुन त्याच्यावर बाण सोडतो. त्याचवेळी समोरून एक किरात, शिकारीही त्या वराहावर बाण सोडतो. ‘किरात’ म्हणजे वनामध्ये राहणारी एक जमात. वराह ठार होतो. तो कुणाच्या बाणाने ठार झाला म्हणजेच शिकारीवर हक्क कुणाचा, यावरून अर्जुन आणि किरात यांच्यात चांगलीच जुंपते. एका सामान्य किराताने आपल्याशी भांडण करावं, याचा अर्जुनाला साहजिकच संताप येतो. गोष्टी बोलाचालीवरून द्वंद्वयुद्धावर येतात आणि अर्जुन आश्चर्याने थक्क होतो. महाधनुर्धर अर्जुनाचे मर्मभेदक बाण तो सामान्य किरात लीलया परतवून लावत असतो. यथावकाश भगवान शंकर ते किरात रूप टाकून आपलं मूळ रूप प्रकट करतात आणि युद्धात कुणालाही सामान्य समजण्याची चूक करू नये, हा महत्त्वाचा धडा अर्जुनाला देऊन नाहीसे होतात.



ही झाली पाच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट
. किरात ही वन्य जमात म्हणून ओळखली जात असे. पण, किरात लोक हे अत्यंत कुशल आणि शूर योद्धे होते. हा मुद्दा यातून अधोरेखित होतो. आता दोन हजार वर्षांपूर्वीची गोष्ट ऐका. जग जिंकण्याच्या ईर्ष्येने युरोपातल्या मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर हा पूर्वेकडे निघाला. पॅलेस्टाईन, अनातोलिया, बॅबिलोनिया, असीरिया इ. प्रदेश जिंकत तो प्रचंड अशा पर्शियन साम्राज्यावर धडकला. भीषण युद्ध झालं आणि पर्शियन सम्राट दरायस दुसरा याच्या सैन्याचा चक्काचूर उडाला. विशाल पर्शियन साम्राज्य अलेक्झांडरच्या एकाच धडकेत कोसळलं. आणि आता गर्वाने, बलाने उन्मत्त झालेला अलेक्झांडर भारताच्या वेशीवर येऊन थडकला. इथे त्याची गाठ पडली ती अनेक छोट्या-छोट्या गणराज्यांशी. एक नगर म्हणजे एक राज्य इतकी छोटी असणारी ही गणराज्यं तलवारीत भलतीच तिखट होती. त्यांनी अलेक्झांडरला दमवलं, रडवलं. सिंधू नदीच्या काठावर राजा पुरू किंवा पोरसाची गाठ पडण्यापूर्वीच अलेक्झांडरचा अर्धा दम उखडला गेलेला होता. या अनेक गणराज्यांमधील एक होतं किरात जमातीचं राज्य.



म्हणजेच आधुनिक जगातलं कलात
. आजच्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातले एक शहर कलात! ऋग्वेद काळातला भलान आणि बौद्ध ग्रंथांमधील ‘बलोक्ष’ म्हणजे आजचा ‘बलोक्षस्थान’ किंवा ‘बलुचिस्तान.’ आपण मराठी माणसांची काही नमुनेदार वैशिष्ट्यं आहेत. कुणाही दक्षिण भारतीयाला आपण खुशाल ‘मद्रासी’ ठरवून टाकतो. दक्षिण भारतात तामिळनाडूसह कर्नाटक, आंध्र आणि केरळ हे प्रांतसुद्धा आहेत. तेथील रहिवाशांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, हे आपल्या गावीच नसतं. तसेच सगळे उत्तर भारतीय म्हणजे ‘भैय्ये’ आणि जरा पिचपिचे डोळे दिसले की ‘चिनी’ अशी समीकरणं आपण ठामपणे ठरवून टाकलेली आहेत. त्याच चालीवर कुणीही उंच, धिप्पाड, दाढीवाला दिसला की आपण त्याला ‘पठाण’ म्हणून मोकळे होतो.



प्रत्यक्षात
‘पख्तुन’ किंवा ‘पश्तुन’ किंवा ‘पठाण’ वेगळे नि बलुची वेगळे. बलुची लोकांचा बलुचिस्तान हा वेगळा प्रांत आहे. भारताचे जसे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इ. २८ प्रांत आहेत, तसेच पाकिस्तानचे पंजाब, सिंध, वायव्य प्रांत आणि बलुचिस्तान असे प्रांत आहेत. प्राचीन किरांतांप्रमाणेच आधुनिक बलुचीदेखील उत्तम लढवय्ये आहेत. इंग्रजांनी भारतातल्या काही जमातींना ‘लढवय्या जाती-मार्शल रेसिस’ असं नाव दिलं होतं. अशा जातींमधून इंग्रजांच्या भारतीय सैन्यात म्हणजे ‘रॉयल इंडियन आर्मी’मध्येनियमित सैन्यभरती केली जात असे. त्यामध्ये बलुच रेजिमेंट होतीच. हिरा, माणिक, पाचू या रत्नांप्रमाणे ‘वैडूर्य’ नावाचं एक रत्न आहे. निळ्या रंगाच्या या रत्नाला संस्कृतमध्ये ‘वैडुर्य’ प्रमाणेच ‘असितोपल’ असंही नाव आहे. इंग्रजीत त्याला ‘लाप्पिस लाझुली’ म्हणतात. या रत्नांच्या खाणी गांधार प्रदेशात म्हणजे अफगाणिस्तानातल्या बदरव्शान भागात आहेत. तिथून ती रत्नं बलुचिस्तान मार्गे पंजाब, राजस्थान, गुजरातपर्यंत येत असत. ‘हिंगला माता मंदिर’ हे नाव आणण नक्कीच ऐकलं असेल. ही ‘हिंगला’ किंवा ‘हिंगुला’ देवी हे आजच्या बलुचिस्तानातलं एक अत्यंत जागृत देवस्थान आहे. आजही अनेक हिंदू यात्रेकरू विशेषतः मारवाडी आणि कच्छी हिंदू पाकिस्तानच्या अनेक कटकटी सोसून या देवीच्या दर्शनाला जात असतात.




इस्लामी आक्रमकांनी आणि पोर्तुगीज पाद्र्यांनी भारतातील असंख्य तीर्थस्थानं उद्ध्वस्त केली
. असंख्य मंदिर मोडून तिथे मशिदी, दर्गे आणि चर्चेस उभारली. पण, अशी काही ठिकाणं आहेत की तिथे त्या दैवताने या आक्रमकांना चांगलाच धडा शिकवला. ‘हिंगलान माता’ हे त्यापैकीच एक स्थान आहे. त्यामुळे बलुची मुसलमानही त्या देवीला भजतात. तिचा उल्लेख ते ‘बीबी नानी’ या नावाने करतात. कलात या शहरातही एक प्रख्यात असं कालीमातेचं स्थान आजही आहे. स्वातंत्र्यासाठी अलेक्झांडरसारख्या बळीवंताशी बेधडक टक्कर घेणारे हे बलुची, इस्लामी आक्रमणासमोर मात्र फिके पडले. गांधार, पश्तुन, बलुची सगळेच मूळचे हिंदू. ते बाटून मुसलमान झाले. वायव्य भारताने आपली युगयुगीन हिंदू परंपरा सोडून परकीय, अरबी, तुर्की उपासाना पद्धती का स्वीकारली, हा एक मोठाच प्रश्न आहे. पण, तरीही अल्पप्रमाणात का होईना, तिथे हिंदू होते. भारतातल्या असंख्य संस्थांमध्ये कलात हेदेखील एक संस्थान होतं. यार मुहम्मद खान हे कलातचे संस्थानिक नबाब होते. बलुचींना पाकिस्तानात सामील होण्यात कसलंही स्वारस्य नव्हतं. पाकिस्तान बनवण्याची कल्पना मुंबई आणि लंडनमध्ये राहणार्‍या मूळ गुजराती भाषिक असलेल्या महमंदअली जीनांची आणि त्यांच्या जोडीने उत्तरप्रदेशी मुसलमानांची. नंतर त्यांच्या पंगतीला आले पंजाबी मुसलमान. पण या सगळ्या घडामोडी नि कारस्थानं शिजत होती लंडनमध्ये, मुंबईत, दिल्लीत, लाहोरात नि कलकत्त्यात. ज्या खैबर नि बोलन खिंडींमधून इस्लामने भारतावर आक्रमण केलं, असं म्हटलं जातं, त्या खिंडीच्या परिसरातल्या पठाणांना आणि बलुचींना या बनावात काहीही स्वारस्य नव्हतं.



पण
, अकस्मात फाळणीच्या रुपाने आकाशींची कुर्‍हाड कोसळली. कोट्यवधी हिंदू परागंदा झाले. लक्षावधी हिंदू कत्तल झाले. फाळणीपूर्व बलुचिस्तानात मुळात सुमारे ५४ हजार हिंदू होते. त्यांची संख्या साडेतीन हजारांवरआली. हिंदू देशोधडीला लागले, पण पठाण नि बलुची हे मुसलमान होते म्हणून मोठेसे सुखात होते असं नाही. पठाणांचे नेते अब्दुल गफारखान यांनी तर भारताच्या निधर्मी नेत्यांनाआम्हाला लांडग्यांसमोर टाकण्यात आलं आहे,” अशा शब्दांत फटकारलं. कोण होते हे लांडगे? पाकिस्तानची सगळी सत्तास्थानं हडपून बसलेले पंजाबी मुसलमान. पाकिस्तानात पंजाब, सिंध, वायव्य प्रांत आणि बलुचिस्तान असे प्रांत आहेत. भारताकडून हडपलेला दोन तृतीयांश काश्मीर हाही एक प्रांत आहे. मुळात बंगाल हासुद्धा एक प्रांत होता. तो १९७१ साली ‘बांगलादेश’ या नावाने स्वतंत्र झाला. पण, उर्वरित पाकिस्तानात काय स्थिती आहे? सिंधी, पठाण, बलुची, काश्मिरी हे कुणीही सुखी नाहीत. कारण, संपूर्ण सत्ता पंजाबच्या हाती एकवटलेली आहे. अयुबखान, याह्याखान, झिया-उल-हक, परवेझ मुशर्रफ हे सगळे लष्करशहा पंजाबी होते. झुल्फिकारअली भुत्तो आणि बेनझीर भुत्तो हे सिंधी होते, पण बहुधा त्यामुळेच त्यांचा काटा काढण्यात आला. पंजाब्यांच्या खालोखाल वजन असलेल्या सिंध्यांची ही दशा, तर पठाण नि बलुची यांना कोण विचारतो? सगळ्यात केविलवाणी स्थिती उत्तर प्रदेशी मुसलमानांची. त्यांनी दंगे करून भारताच्या निधर्मी नेत्यांना घाबरवून सोडलं आणि पाकिस्तानचं दान पदरातपाडवून घेतलं. याबद्दल त्यांना बक्षीस काय मिळालं, तर त्यांना ‘मुहाजीर’ म्हणजे ‘परके’ ही पदवी मिळाली.



अलीकडेच इस्लामाबादच्या
डेली टाईम्स’ या वृत्तपत्रात मुहम्मद अकबर नोटेझाई नावाच्या पत्रकाराने ‘बलुचिस्तानातल्या हिंदूंची दयनीय स्थिती’ या विषयावर एक लेख लिहिला आहे. १९४७ पूर्वी बलुचिस्तान प्रांतात ५४ हजार हिंदू होते, ते फाळणीनंतर फक्त साडेतीन हजार राहिले असं त्यानेच म्हटलं आहे. आता सततच्या धमक्या, जबरी धर्मांतरणं, बायका पळवणं यांना कंटाळून तेदेखील स्थलांतर करीत आहेत, असं तो म्हणतो. नोटेझाई पुढे म्हणतो की, जुन्या बलुची मुसलमानांना हे माहीत होतं की, हे हिंदूदेखील आपल्यासारखचेच पिढ्यान्पिढ्या इथे राहत आहेत. त्यामुळे लाहोर आणि कराचीत जशा हिंदूंच्या बेछूट कत्तली झाल्या, तितक्या बलुचिस्तानातल्या क्वेट्टा आणि कलातमध्ये झाल्या नाहीत. पण, आता नव्या बलुची पिढीला हे काहीच माहीत नाही. त्यामुळे हिंदूंचा छळ वाढत चालला आहे. नोटेझाईच्या या लेखावर एक बलुची विद्वान डॉ. शाह मुहम्मद मर्री याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डॉ. मर्री म्हणतो, “हिंदूंनाच जिणं अवघड झालयं असं नव्हे. आम्ही बलुची, पठाण, हाजरा, ख्रिश्चन सगळेच हैराण झालोय. ही सगळी भूमीच म्हणजे बलुचिस्तान प्रांत जळते आहे. सगळ्यात जाती आणि जमाती सुरक्षित आसरा शोधण्यासाठी स्थलांतर करतायत.” पाकिस्तान निर्माण होऊन आता ७२ वर्षं उलटली. प्रशासन आणि लष्कर यांवरची पंजाब्यांची पकड काही सुटत नाही. त्यामुळेच बलुची, पठाण, सिंधी सगळ्यांनाच स्वतंत्र व्हायचंय आणि त्यामुळेच त्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरतोय. देशाच्या उत्पन्नाचा (म्हणजे अमेरिकेकडून येणार्‍या कोट्यवधी डॉलर्सचा) सगळा ओघ पंजाबमध्येच अदृश्य होतो. इतर प्रांतांना काहीच मिळत नाही. अशी आहे बलुचिस्तानची सध्याची दशा.

@@AUTHORINFO_V1@@