या चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचा सन्मान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2019
Total Views |


एका आईने पोलीस यंत्रणेविरुद्ध दिलेल्या लढ्याची हेलावणारी कथा असलेल्या 'माई घाट : क्राइम नं. १०३/२००५' या मराठी चित्रपटाची पहिल्यांदाच 'सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात' बेस्ट चित्रपटाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविणारा पहिला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही मराठी चित्रपटाला हा सन्मान मिळालेला नाही. आठ देशातील चौदा चित्रपटांतून पहिल्या सहात निवडल्यानंतर त्यामधून 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'संकलन' 'छायाचित्रण' असे पहिल्या श्रेणीतील तीन महत्वाचे पुरस्कार पटकावून बाजी मारलेला आजपर्यंतचा हा एकमेव मराठी चित्रपट आहे. महिला सबळीकरणाची कथा सांगणारा हा चित्रपट युवा निर्माती मोहिनी रामचंद्र गुप्ता त्यांच्या 'अलकेमी व्हिजन वर्क्स'ची निर्मिती असून अत्यंत वेगळ्या जातकुळीच्या अंतर्मुख करणाऱ्या सत्यघटनेवरील या चित्रपटात एका महिलेनी दिलेला विलक्षण लढा, त्यावर तिने मिळविलेला रोमहर्षक विजय याची गाथा काळजाला हात घालणारी असल्यानं हे निर्मितीचं शिवधनुष्य मोहिनी रामचंद्र गुप्ता या तरुणीने उचलले आहे.

'माई घाट' हा सिनेमा चार नॅशनल पुरस्कार विजेत्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या 'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी दिग्दर्शित केला असून, लेखन आणि संकलनही त्यांनीच केले आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'सिंगापूर साऊथ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'माई घाट' ने सात विभागांमध्ये तब्बल सहा नामांकने मिळवत 'बेस्ट फिल्म', 'बेस्ट एडिटींग', 'बेस्ट सिनेमॅटोग्राफी'चे पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. हाँग काँग अँड चायनाचे फिल्ममेकर आणि फेस्टिव्हल ऑथॅारीटी असलेल्या रॅाजर गार्सीया यांनीही 'माई घाट'च्या पाठीवर कौतुकाची थाप मारत न्याय व्यवस्थेतील ढिलाई दर्शवणाऱ्या या वास्तवदर्शी सिनेमावर स्तुती सुमनांची उधळण केली आहे. याखेरीज 'द एशियन पॅसिफीक स्क्रीन अवॅार्डस २०१९' च्या स्पर्धेसाठी या सिनेमाची अधिकृत निवड करण्यात आली होती.


सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाची कथा आईची इच्छाशक्ती दर्शवणारी आहे. माता प्रभावती अम्मा यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कायद्याच्या रक्षकांविरुद्ध दिलेला लढा या सिनेमाच्या माध्यमातून जगासमोर आणण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधन हिनं या चित्रपटात आईची व्यक्तिरेखा सजीव केली असून, आपल्या अभिनय कौशल्याने तिने परीक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनाच अंतर्मुख होऊन विचार करायला लावला आहे. उषा जाधवसोबत या सिनेमात सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत, डॅा. गिरीश ओक, विभावरी जोशी आणि विवेक चाबूकस्वार अशी कुशल मराठी कलाकारांची फळी आहे.

लेखन, अभिनय आणि संकलन पातळीवर सशक्त असलेला 'माई घाट' तांत्रिकदृष्ट्याही अतिशय सक्षम आहे. आज जिथे ४के कॅमेऱ्याने मराठी सिनेमा शूट केला जातो, तिथं सिनेमॅटोग्राफर अल्फॅान्से रॅाय यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ६के फॅारमॅटवर 'माई घाट' चित्रीत करत सिंगापूर महोत्सवातील पुरस्कार आपल्या नावे करण्यात यश मिळवलं आहे. यातील सिक साऊंड संवादातील अर्थ अधिक स्पष्टपणे मनावर ठसवण्यात यशस्वी ठरला आहे. पूर्णिमा ओक यांचे वास्तवदर्शी कॅास्च्युम आणि रोहित कुलकर्णी यांचे ओरिजनल पार्श्वसंगीतानं 'माई घाट'ला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.


@@AUTHORINFO_V1@@