गुगल २१ वर्षांचे झाले ! त्यानिमित्त 'हे' खास डुडल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असलेले गुगल आज २१ वर्षांचे झाले. जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन 'गुगल'ला २१ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने गुगलने जुन्या कॉम्प्युटरच्या 'थ्रो बॅक' फोटोचे खास डुडल साकारले आहे. गुगलने अनेक महत्त्वाच्या घटना, महान व्यक्तींची पुण्यतिथी, जयंती या दिवशी डुडलद्वारे त्या व्यक्तींना मानवंदना दिली. जगातल्या प्रसिद्ध व्यक्तींचे वाढदिवस विशेष डुडल साकारून सेलिब्रेट करणाऱ्या गुगलने स्वत:च्या वाढदिवसाचेदेखील खास डुडल साकारले आहे.

 

२० शतकामधील कम्प्युटर डुडलमध्ये पाहायला मिळत आहे. त्या फोटोवर २७ सप्टेंबर, १९९८ अशी तारीख देण्यात आलेली आहे. यासोबत मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि प्रिंटरही पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी गुगलने डुडलवर एक व्हिडिओ प्ले केला होता. त्या व्हिडिओत गुगलने गेल्या २० वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला होता. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली.

 

१९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर करत अधिकृतपणे 'गुगल' हे नाव ठेवले. गुगल हे सर्च इंजिन नऊ भारतीय भाषांमध्ये आणि जगभरातल्या १२४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. गुगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. मागील २० वर्षांत गुगलने यशाची उत्तुंग झेप घेतली असून भारतात Google.co.in ही सेवा मराठी, हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्ध आहे.

@@AUTHORINFO_V1@@