रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2019
Total Views |




मुंबई महानगरपालिकेत राज्याचे अप्पर सचिव प्रवीणसिंह परदेशी यांना राज्याच्या कामकाजाचा अनुभव असल्याने मोकळे रस्ते हे त्या त्या भागाच्या विकासाला चालना देणारे असतात
, हे त्यांना पक्के ठाऊक असल्याने परदेशी यांनी मुंबईतील रस्ते मोकळे करण्याला प्राधान्य दिले. त्यासाठी २६ ठिकाणी पार्किंग सेंटर सुरू करून त्या भागातील रस्ते ‘नो पार्किंग’ जाहीर केले.


मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर झाले आहे. या मायावी नगरीत देशाच्या कानाकोपर्‍यातून लोक रोजीरोटीसाठी येऊ लागले. त्यामुळे जागा कमी पडू लागली. बकालवस्ती वाढली. या सगळ्याचा ताण साहजिकच मुंबईच्या पायाभूत सुविधांवरही पडला. रेल्वेमधील, बसमधील गर्दी वाढली आणि रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येनेही कळस गाठला. परिणामस्वरुप, मुंबईतील मोठमोठाल्या द्रुतगती महामार्गांपासून ते अगदी लहान रस्त्यांपर्यंत वाहतूककोडींचा सामना आज मुंबईकरांना करावा लागतोमुंबईचे क्षेत्रफळ ६०३.४ किमी (२३३ चौरस मैल) असून रस्त्यांची लांबी अंदाजे दोन हजार किलोमीटर आहे. चांगले रस्ते हे त्या शहराच्या धमन्या असतात. मात्र, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते अपुरे पडू लागले. सध्या मुंबईची लोकसंख्या पावणेदोन कोटींच्या घरात आहे. याच वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे.


रक्तामध्ये गुठळ्या निर्माण झाल्यास रक्तवाहिन्या जशा ब्लॉक होतात, त्याप्रमाणे वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते ब्लॉक होऊ लागले. लोकांचा प्रवासही कंटाळवाणा होऊ लागला. हीच परिस्थिती कामय राहिली तर उद्या मुंबईचे आणि मुंबईकरांचे काय होणार, अशी चिंता भेडसावू लागली. अशा वेळी मुंबई महानगरपालिकेत राज्याचे अप्पर सचिव प्रवीणसिंह परदेशी आयुक्त म्हणून रुजू झाले आणि हीच मुंबईकरांच्या भाग्याची गोष्ट ठरली. 
परदेशी यांना राज्याच्या कामकाजाचा अनुभव असल्याने मोकळे रस्ते हे त्या त्या भागाच्या विकासाला चालना देणारे असतात, हे त्यांना पक्के ठाऊक असल्याने परदेशी यांनी मुंबईतील रस्ते मोकळे करण्याला प्राधान्य दिले. त्यासाठी २६ ठिकाणी पार्किंग सेंटर सुरू करून त्या भागातील रस्ते ‘नो पार्किंग’ जाहीर केले. इतकेच नव्हे तर रस्त्यात उभ्या राहणार्‍या वाहनांना कमीत कमी १० हजार रुपयांपर्यंत जबर दंडही आकारला. त्यामुळे पार्किंग सेंटरमध्ये वाहनांची संख्या वाढली आणि रस्त्यातून कमी झाली, रस्त्यांना श्वास घ्यायला मोकळीक मिळाली आणि वाहनेही गतिमान झाली. केवळ आयुक्तांनी धाडसी निर्णय घेतल्यानेच येथील नागरिकांचा प्रवास गतिमान झाला, हे निश्चित.




...म्हणूनच ‘बेस्ट’ची चाके गतिमान!



दाटीवाटीने भरलेल्या महामुंबईत रेल्वे आणि
‘बेस्ट’ या जीवनवाहिन्या आहेत. यातली एखादी जीवनवाहिनी ब्लॉक झाली तरी अख्खी मुंबई सलाईनवर जाते. गल्लीबोळात धावणार्‍या ‘बेस्ट’ बसेस मुंबईकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या झाल्या आहेत. मात्र, हाच ‘बेस्ट’ उपक्रम मागील आठ-दहा वर्षांत आर्थिक डबघाईला आल्यामुळे सामान्य प्रवासी आणि बेस्टचे नाते तुटल्यासारखे झाले होते. एकेकाळी‘बेस्ट’मधून प्रवास करणार्‍यांची संख्या ३५ ते ४० लाखांच्या घरात होती. मात्र, बसेसची घटणारी संख्या, कर्मचार्‍यांची थांबलेली भरती, बसेसच्या सातत्यात आलेली मरगळ यामुळे ‘बेस्ट’ची आर्थिक घडी विस्कळीत झाली. पाच वर्षांपूर्वी असलेली ४२०० गाड्यांची संख्या आता ३३३७ पर्यंत घसरली. २२ लाख प्रवासी टिकवून ठेवणे हेसुद्ध ‘बेस्ट’पुढे आव्हान ठरले. साहजिकच ‘बेस्ट’चा वर्षाचा तोटा २५० कोटी रुपयांपर्यंत गेला होता. ‘बेस्ट’ बसेसची घटती संख्या, प्रवाशांनी फिरवलेली पाठ आणि निवृत्त झालेल्या कर्मचाची थकलेली देणी यामुळे स्तुतीस पात्र ठरलेली ‘बेस्ट’ टीकेची धनी होऊ लागली होती. ती इतिहासजमा होणार, असेच सर्वांना वाटले होते. अशा वेळी महापालिकेत एका मसिहाचे पदार्पण झाले आणि तेच बेस्टच्या ऊर्जितावस्थेचे कारण ठरले.


ते मसिहा म्हणजे महापालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी. ‘बेस्ट’ बस ही मुंबईच्या सर्वसामान्यांचे वाहन आहे. तिची चाके आर्थिक गर्तेत रुतली तर खासगी वाहनांकडून सामान्य प्रवासी लुटले जातील आणि त्यांना रोजीरोटी कमविणे मुश्कील होईल, हे परदेशी यांनी जाणले आणि पालिकेत रुजू होताच त्यांनी ‘बेस्ट’ला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. ‘बेस्ट’चा तुटीचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करून घेण्याचा निर्णय घेतला. लगेचच ‘बेस्ट’ला सुरुवातीला ६०० कोटी, त्यानंतर १२०० कोटी आणि तिसर्‍या टप्प्यात ४०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यातील बरीचशी रक्कम ‘बेस्ट’च्या तिजोरीत जमा झाली. त्यामुळेच ‘बेस्ट’ कर्जमुक्त होत आहेच. शिवाय ‘बेस्ट’च्या ताफ्यातही वाढ होत आहे. इतकेच नव्हे, तर प्रवासी ‘बेस्ट’कडे आकर्षित व्हावेत यासाठी ‘बेस्ट’चे पहिल्या टप्प्याचे प्रवासीभाडेही कमी केले. भाडेकपातीमुळे महसुलात घट झाली असली तरी प्रवासी आकर्षित करून नंतर त्यांच्याकडून महसूलवाढीसाठी प्रयत्न करता येतात, हे परदेशी यांनी जाणले. त्यांच्या दूरदर्शीपणामुळे ‘बेस्ट’ची चाके गतिमान झाली.


-अरविंद सुर्वे
@@AUTHORINFO_V1@@