'सैरा-नरसिंहा रेड्डी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2019
Total Views |


बॉलिवूडचे शेहेनशहा अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक मेगा स्टार चिरंजीवी या दोन्ही महान कलाकारांना प्रथमच एकत्र काम करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ते 'सैरा-नरसिंह रेड्डी' या आगामी चित्रपटात. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आज प्रदर्शित झाला.

घनघोर युद्धानी भरलेल्या या ट्रेलरमध्ये चिरंजीवी आणि अमिताभ यांच्या भूमिकांची झलक दिसून येत आहे. सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अमिताभ आणि चिरंजीवी यांच्यासह किच्चा सुदीप, विजय सेथुपथी, जगपथी बाबू, रवी किशन, नयनथारा, तमन्ना, निहारिका हे प्रसिद्ध कलाकार देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

दरम्यान यापूर्वी या चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 'सैरा-नरसिंह रेड्डी' हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. २ ऑक्टोबरलाच ह्रितिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा वाॅर हा चित्रपट देखील प्रदर्शित होणारे. त्यामुळे आता या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@