ब्रिटानिया अँड कंपनीचे मालक बोमन कोहिनूर यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2019
Total Views |


 


मुंबई : मुंबईतील ब्रिटानिया अॅण्ड कंपनी रेस्टॉरंटचे मालक बोमन कोहिनूर यांचे निधन झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. अखेर बुधवारी वयाच्या ९७ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. इराणमधील झोरोएस्टेरियन प्रवासी आणि बोमन कोहिनूर यांचे वडिल रशीद कोहिनूर यांनी १९२३ साली ब्रिटानिया अॅण्ड कंपनीची रेस्टॉरंटची स्थापना केली. रेस्टॉरंटची स्थापना केल्यानंतर रशीद कोहिनूर हे रेस्टॉरंट सांभाळत होते. त्यांच्यानंतर या रेस्टॉरंटची जबाबदारी बोमन कोहिनूर यांनी वयाच्या २० वर्षी सांभाळायला घेतली.

 

बोमन कोहिनूर हे एक आनंदी व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. ते नेहमी आनंदी राहायचे. तसेच ते स्वत: जाऊन ग्राहकांशी गप्पा मारायचे. त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना ते आपल्या रेस्टॉरंटचे जुने फोटो दाखवून गमतीजमती सांगून त्यांना हसवायचे. तसेच त्यांना काय हवं? नको? याची देखील विचारपूस करायचे. त्याचप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना ते ‘बेरी पुलाव‘ नक्की ट्राय करा, ही रेसिपी माझ्या पत्तीने केली आहे. तसेच दोन लोकांमध्ये एक बेरी पुलाव घेतला आहात? दोघांना पुरेल ना?, असे दखील विचारायचे.

@@AUTHORINFO_V1@@