नगर-दौंड मार्गावर अपघातात चार ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2019
Total Views |
 


अहमदनगर : नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरानजीक ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत. हे सर्वजण श्रीगोंद्याहून नगरला जात होते. गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. नगर दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक व कार यांच्यात जोरदार धडक झाली.

या अपघातात कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. श्रीगोंद्याहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलविण्यात मदत केली. पोलीस अद्याप मृतांची ओळख पटवत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@