लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला करू मतदान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |


उत्सव लोकशाहीचा, उत्सव मतदानाचा !

नवमतदारांसाठी तथा मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे डिजिटल अभियान




महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील मतदारांमध्ये जनजागृती अभियानाची जोरदार तयारी सुरू केली आहे. यात नवमतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविणे किंवा नोंदीतील दुरुस्ती करणे, मतदार यादीतील नावाचे स्थलांतरण करणे आदी गोष्टींचा समावेश आहे. सोशल मीडियाद्वारे सर्वाधिक प्रमाणात युवावर्गाला लक्ष्य करून जास्तीत-जास्त युवा मतदारांनी या अभियानात सामील व्हावे यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 




समाजामध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सुप्रसिद्ध कलाकारदेखील यामध्ये आपला सहभाग दर्शवत आहेत. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांनीदेखील ‘बाळगू लोकशाहीचा अभिमान, चला करू मतदान’असे म्हणत लोकशाहीचा जागर करण्यासाठी आपला सहभाग दर्शविला आहे. एक उत्सव आला आहे लोकशाहीच्या उत्कर्षाचा, मतदार म्हणून आपली भूमिका पार पाडण्याचा’ असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

या जाहिराती पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांवर क्लिक करा.

https://www.facebook.com/ChiefElectoralOfficerMaharashtra/videos/425925068049309/

https://www.facebook.com/ChiefElectoralOfficerMaharashtra/videos/513594476121338/








 

या मोहिमेसोबतच मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील सोशल मीडिया मोहिमा हिट ठरत आहेत. जसे की, मागील महिन्यात निवडणूक आयोगाच्यावतीने १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? याचा संबंध मतदानाशी साधून मतदारांना आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी 'मतदान' म्हणजेच खरे स्वातंत्र्य, अशी संकल्पना मांडण्यात आली होती. तसेच याबाबत माहिती देणारी चित्रफितदेखील प्रसिद्ध करण्यात आली होती. फेसबुक, युट्यूब, ट्विटर अशा विविध माध्यमांवर या अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला होता.







 

उदा.

स्वातंत्र्य म्हणजे माझा आवाज, स्वातंत्र्य म्हणजे माझा अधिकार, स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक जबाबदारीचे भान, स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही, स्वातंत्र्य म्हणजे माझे मत, स्वातंत्र्य म्हणजे मत मांडण्याचा हक्क अशा उदाहरणांमार्फत
https://www.nvsp.in/या संकेतस्थळाला भेट देऊन मतदार यादीत आपल्या नावाची नोंद अथवा नोंदीमध्ये दुरुस्ती करून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. 






 

‘स्वातंत्र्य म्हणजे...’ या मोहिमेला नवमतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अनेक मतदारांनी आपली नावनोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. आपला अधिकार वापरून त्यांनी स्वातंत्र्य मिळवले आहे. मग तुम्ही कधी स्वतंत्र होतायमतदानाच्या प्रक्रियेबाबत नागरिकांना महत्त्व पटवून देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सोशल मीडियावर अनेक जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. जेणेकरून नागरिकांनी मोठ्या संख्येनी पुढाकार घ्यावा व लोकशाहीला सशक्त बनवावे.






 

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्याचे सोशल मीडिया कॅम्पेन्स पाहण्यासाठी खालील संकेतस्थळावर क्लिक करा आणि फॉलो करा.

फेसबुक - https://www.facebook.com/ChiefElectoralOfficerMaharashtra

ट्विटर - https://twitter.com/CEO_Maharashtra

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/Ceo_Maharashtra

युट्युब - https://www.youtube.com/channel/UCyhH4x59W2SjX_265uYsljQ









 

@@AUTHORINFO_V1@@