या कारणामुळे द. आफ्रिकेविरुद्ध बुमराह 'आऊट'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला आगामी दक्षिण आफ्रिकेविरुयुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला या मालिकेला मुकावे लागणार आहे. बुमराहच्या जागी उमेश यादवला भारतीय संघात स्थान दिले आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराहने आपल्या ट्विटरवरून भावनिक पोस्ट टाकत मी पुन्हा नव्या जोमाने पुनरागमन कारेन असा विश्वास दिला.

 

"दुखापत हे कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यातल्या महत्वाचा भाग असतो, त्याला टाळता येत नाही. मला दाखवलेल्या पाठींब्यासाठी मी आपला आभारी आहे, लवकरच भारतीय संघात नव्या उमेदीने पुनरागमन करेन." अशी भावनिक पोस्ट जसप्रीत बुमराहने केली आहे. २ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-१ अशी बरोबरी साधली आहे. आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत बुमराहला भारतीय संघात विश्रांती देण्यात आली होती. मात्र सध्या बुमराहला झालेली दुखापत पाहता बांगलादेशविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकेतही बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

@@AUTHORINFO_V1@@