तिहेरी तलाक पीडितांना ६००० रुपये देणार : योगी आदित्यनाथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |



लखनऊ : उत्तरप्रदेशमधील ज्या मुस्लिम महिलांना तिहेरी तलाक देऊन त्यांच्या पतीने वाऱ्यावर सोडले आहे, त्यांना सरकार दरवर्षी ६ हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. तिहेरी तलाक पीडित महिलांची भेट घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली. मुस्लिम महिलांसोबतच हिंदू महिलांनाही न्याय देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

"तिहेरी तलाक पीडित महिलांसाठी विशेष योजना बनवण्यात येणार आहे. या पीडित महिलांना जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत सरकारकडून त्यांना प्रतिवर्ष ६ हजार रुपये दिले जाईल. एक विवाह केल्यानंतर दुसऱ्या पत्नीला ठेवणाऱ्या हिंदू पतीविरोधात सुद्धा कडक कारवाई करण्यात येणार आहे. समाजातील कोणत्याही घटकातील व्यक्तीने स्वतःला दुःखी समजू नये. त्यांच्यासाठी सरकार अनेक चांगल्या योजना राबवणार आहे. स्वातंत्र्यांनंतर या सर्व समस्यांचे निराकरण करणे गरजेचे होते. परंतु, अद्याप ते करण्यात आले नाही." असे सांगत त्यांनी आधीच्या सरकारवर टीका केली.

 

"उत्तर प्रदेशात एका वर्षात २७३ प्रकरणे समोर आले होते. त्या सर्व प्रकरणांची आम्ही गांभिर्याने नोंद घेत त्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. गृह सचिवाच्या प्रमुखांना या ठिकाणी मी मुद्दामहून बोलावले आहे. या सर्व प्रकरणात त्यांनी स्वतः लक्ष घालावे. जे पोलीस कर्मचारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी." असे आदेश दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

@@AUTHORINFO_V1@@