'टेरीस्तानसोबत चर्चा नाहीच' -एस जयशंकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |




'
कलम ३७० रद्द केल्याने सीमेपलिकडील लोकांना त्रास होण्याचे कारण नाही'


न्यूयॉर्क : पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा आहे हे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. तसेच चीनसोबतही दौऱ्यादरम्यान बोलणे झाले असल्याचे चीनच्या सर्व शंका दूर केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कलम ३७० रद्द करणे हे भारताचा अंतर्गत मुद्दा असून , सीमेपलिकडील लोकांना याचा त्रास होण्याचे काहीच कारण नाही. आम्ही आमच्या हद्दीत राहूनच सुधारणा केल्या आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.



"
आम्ही पाकिस्तानशी सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहोत परंतु, टेरीस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही", असे एस जयशंकर यांनी स्पष्ट केले. न्यूयॉर्क येथे आयोजित आशिया सोसायटी सांस्कृतिक संघटनेच्या कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानवर हल्ला चढवला. काश्मीरची समस्या वाढविण्यासाठी पाकिस्तान सवर्तोपरी प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांनीच ही समस्या वाढावी याकरिता दहशतवादाला थारा दिला आहे.


कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळावा याकरिता प्रयत्न केले. परंतु निराशेशिवाय त्यांच्या हाती काहीच लागले नाही. गेली काही वर्षे काश्मीरमध्ये निर्माण केलेला दहशतवाद केंद्र सरकारच्या निर्णयाने संपुष्टात आल्याने पाकिस्तान निराशावादी झाले असल्याची टीका त्यांनी केली. 

@@AUTHORINFO_V1@@