पवार ईडीच्या कार्यालयात जाणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |




मुंबई : शिखर बॅंक प्रकरणात कथित गैरव्यवहाराच्या आरोपाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात पवार आता स्वतः ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता मुंबईस्थित ईडीच्या कार्यालयात पवार उपस्थित असणार आहेत.

"मी माझी स्वतःची भूमिका अशी आहे, की मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. माझा नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घ्यायचे आहे. महिनाभर मी निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार आहे. त्यामुळे माझी वास्तव्य मुंबईच्या बाहेर राहणार आहे.

 

राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना माझ्याबाबत जी माहिती हवी असेल ती देईन असेही पवार म्हणाले. राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एकूण ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. ईडीच्या या कारवार्ईनंतर या सर्व नेत्यांवर अटकेची टांगती तलावर कायम असून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोटाळेबाज विरोधकांचे वांदे झाले आहेत.


ईडीने दिलेल्या माहितीनुसार एकूण २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. सहकारी बँक आर्थिक स्थितीत कमकुवत असतानाही अनेक साखर कारखान्यांना कर्जे मंजूर करण्यात आली. कर्ज वाटप करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती, असा ठपका ईडीने चौकशीदरम्यान ठेवला असून याप्रकरणी एकूण ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह ७०जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

सहकारी साखर कारखाने आजारी पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासाठी अतिशय कमी किमतीत विकली गेल्याचे ईडीने म्हटले आहे. सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकल्या गेल्याचा दावाही ईडीने केला आहे. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अतिशय मनमानीने कर्ज वाटप केले होते. यामुळे बँकेला तब्बल १० हजार कोटींचे नुकसान झाले होते. या प्रकरणात अण्णा हजारे यांनी तीन वर्षांआधीच याचिका दाखल केली होती.

 

याप्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली होती. चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर अखेर कोर्टाने याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आता तब्बल ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते. अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील आणि शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आले होते. मात्र आता ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याने शरद पवार आणि अजित पवारांवरही गुन्हे दाखल केले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@