ट्रम्प म्हणतात नरेंद्र मोदी म्हणजे 'फादर ऑफ इंडिया'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींनी भारतात केलेल्या कामाचे कौतुक केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना त्यांचा 'फादर ऑफ इंडिया' असा उल्लेख केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान व्यक्तिमत्व आहेत. भारतातील परिस्थिती याआधी अशी नव्हती. मोदींनी विखुरलेला भारत एकत्र आणला. त्यामुळे ते भारताच्या राष्ट्रपित्यासारखेच आहेत. त्यांना भारताचे 'फादर ऑफ इंडिया' म्हंटले तर वावगे ठरणार नाही." असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

 

न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानातील आयएसआय आणि अल कायदा याबाबत ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलतांना ट्रम्प यांनी सांगितले की, दहशतवादाविरोधातील मोहिमेत अमेरिका भारतासोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान एकामेकांची चर्चा करून जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर तोडगा काढू शकतात.

@@AUTHORINFO_V1@@