मध्यप्रदेशमध्ये लढाऊ मिग २१ कोसळले ; पायलट सुरक्षित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |


 

भोपाळ : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे वायू सेनेचे लढाऊ विमान मिग- २१ कोसळले. या अपघातातून विमानातील दोघेही वैमानिक बचावले आहेत. हे विमान गस्त घालत असताना ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त झालेले मिग- २१ लढाऊ विमान प्रशिक्षणासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.

 

या वर्षात मिग क्रॅश होण्याची ही तिसरी घटना आहे. या विमानात एक ग्रुप कॅप्टन आणि एक स्क्वॉड्रन लीडर बसले होते. विंग कमांडर अभिनंदन यांचेही मिग विमान असेच कोसळले होते. त्यानंतर मार्चमध्ये राजस्थानच्या बीकानेरमध्ये देखील एक मिग-२१ कोसळल्याची दुर्घटना घडली होती.

@@AUTHORINFO_V1@@