कपिल पाठारे यांना बॉल्सब्रिज युनिव्हर्सिटीकडून "डॉक्टरेट इन ‍बिझनेस'ची पदवी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |
 


मुंबई : व्हीआयपी क्लोदिंग लिमिटेडचे संचालक कपिल पाठारे यांना त्यांच्या व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बॉल्सब्रिज युनिव्हर्सिटीकडून 'मानद डॉक्टरेट इन बिझनेस' ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रथितयश व्यावसायिक आणि लेखक असलेल्या कपिल यांना व्यवसाय आणि छोट्या व्यवसायांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर प्रसार करून नेल्याबद्दल एंटरप्राईजेस एडिशन २०१९ मध्ये ग्लोबल लीडर्स ॲवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. ‍

 

बॉल्सब्रिज युनिव्हर्सिटीकडून विशेष पुरस्कार मिळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी स्वत:ला एक परंपरागत व्यावसायिक मानत नाही. माझ्यासाठी व्यवसाय म्हणजे उत्पादनांची गुणवत्ता व सेवा आहे. कोणतीही व्यक्ती व्यवसायात तेव्हाच यशस्वी होते जेव्हा मनुष्यबळ, दृष्टिकोनकौशल्ये आणि मूल्ये एकत्र येऊन संस्थेकरिता काम करतात. तुमच्याकडे चांगली व्यावसायिक योजना असते पण त्या योजनेला तुम्हाला सिध्द करून दाखवावे लागते.कपिल पाठारे यांनी सांगितले.

 

कपिल पाठारे यांनी मॅक्सवेल इंडस्ट्रीज लिमिटेडबरोबर २००१ पासून काम सुरू केले आणि त्यांनी कंपनीत मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमता दाखवली. अंतर्वस्त्रांचे परंपरागत उत्पादक- मार्केटर आणि वितरक अशी शृंखला न राखता त्यांनी कंपनीला आधुनिक साज चढवला आणि एक चांगला वितरक म्हणून नाव मिळवले. योग्य पायाभूत सुविधा, योग्य मनुष्यबळ, योग्य नेतृत्व आणि योग्य दृष्टिकोन यामुळे बाजारपेठेत ते यशस्वी झाले.

 

काही वर्षांच्या अनुभवातून त्यांनी मार्केटिंग, उत्पादन, विक्री, जाहिरात, व्यवसायाची सुरुवात आदीमध्ये यश मिळवत मॅक्सवेल इंडस्ट्रीज या व्हीआयपी ग्रुपच्या अंतर्वस्त्र, महिलांची वस्त्रे, तयार कपडे, मोजे आणि अन्य उत्पादनांचे उत्पादक व विक्रेते असलेल्या कंपनीचे नाव प्रस्थापित केले.

 

व्हीआयपी ग्रुपने नेहमीच आपल्या उत्पादनाचे ब्रॅन्डिंग करत लोकांमध्ये प्रिमियम ब्रॅन्डपासून सर्वसाधारण लोकांपर्यंत ब्रॅन्डची छबी निर्माण केली आहे. कंपनीने काळाची पावले ओळखून फ्रेंची आणि फ्रेंची एक्स इनरवेअर ब्रॅन्ड्स हे भारतीय बाजारपेठेत आणि परदेशात आणले असून त्यामुळे देशातील तरूणाईला हा ब्रॅन्ड आवडू लागला आहे.

@@AUTHORINFO_V1@@