पुण्यात 'येवले चहा'वर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |
 



पुणे : 'अमृततुल्य चहा', अशी ओळख असणाऱ्या येवले अमृततुल्य चहावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. येवले अमृततुल्य चहाच्या नमुन्यांमध्ये त्रुटी आढळल्याने चहा पावडर, चहाच्या मसाल्याच्या उत्पादनावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आरोग्यास अपायकारक असलेल्या मेलानाईटपदार्थ वापरल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

 
 

येवले चहाची चहा पावडर, साखर, चहाचा मसाला असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा माल पुण्यातून अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. त्याचसह पुढील आदेशापर्यंत उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. जनहित आणि आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

 
 

विक्री करण्यात येत असलेल्या पाकिटांवर अन्न व औषध प्रशासनाच्या निर्देशानुसार आवश्यक माहिती छापण्यात आली नव्हती. पाकिटातील अन्नपदार्थ आणि घटकपदार्थांच्या प्रमाणाचीही माहिती पाकिटावर नसल्याने तसेच अन्नपदार्थाची प्रयोगशाळेकडून तपासणी केली जात नव्हती. उत्पादन नियंत्रणासाठी तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूकही नाही, उत्पादनाच्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र नाही, अशा त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@