विनाकागदपत्रे वाहन चालवल्यास आता दंड नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |


 


डिजिलॉकर आणि मोबाईल नसल्यासही पोलीस तपासणार कागदपत्रे

 
 

नवी दिल्ली : वाहतूक नियमात दंडाची रक्कम दुप्पट केल्यानंतर प्रशासनाने आता वाहनचालकांना दिलासादायक निर्णय घेतला आहे. बऱ्याचदा वाहनाची कागदपत्रे आणि परवाना सोबत नसल्याने विनाकारण चालकाला भुर्दंड बसतो, यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने नव्याने परिपत्रक काढत अशावेळी थेट दंड न आकारण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत.

 


राज्य सरकारांना याची अंमलबजावणी करण्यास सांगितली आहे. ज्यावेळी चालकाकडे त्याचा वाहन परवाना उपलब्ध नसेल तर ऑनलाईन परवाना पडताळणी करून घेण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. यावेळी वाहनचालकाला त्याचा वाहन परवाना क्रमांक सांगावा लागणार आहे. जर त्याच्याकडे मोबाईल असेल तर डिजिलॉकरद्वारे ही पडताळणी होऊ शकते. मात्र, मोबाईल सोबत नसल्यासही आता ही पडताळणी शक्य होणार आहे. रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या नव्या परिपत्रकानुसार डिजिलॉकर आणि एमपरिवहन या अँपमध्ये अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी वाहतूक पोलीस करू शकणार आहेत.

 

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या वाहनासंबंधातील सर्व कागदपत्रे अँपमध्ये अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे दरवेळी सर्व कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज भासणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. वाहन परवाना, विमा, पीयुसी आदी पुरावे या अँपमध्ये अपलोड केले जाऊ शकतात. वाहतूक पोलीस ज्यावेळी मागणी करतील त्यावेळी त्यांना मोबाईलवरच सर्व माहिती दाखवता येईल. मोबाईल नसल्यास पोलीस ऑनलाईन ही सर्व माहिती पाहू शकणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@