दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाल्यावर काय म्हणाले बीग बी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |


 

चित्रपट सृष्टीवर २ पिढ्यांपेक्षा जास्त काळ अधिराज्य गाजवणाऱ्या आणि सर्वांची माने जिंकणाऱ्या शेहेनशहा अमिताभ बच्चन यांना चित्रपट जगतातील सर्वोच्च मनाचा पुरस्कार म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. या अनानंदाच्या बातमीमुळे देशातील अनेक स्तरांमधून बीग बींवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. पुरस्कार जाहीर झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरून चाहत्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

 

अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत प्रेक्षकांना हसवले, भावूक केले, प्रेरित केले, उद्बोधित केले आणि प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या इतक्या वर्षांची मेहेनत, कष्ट, जिद्द आणि निष्ठा या सगळ्या गोष्टी आणि त्याहीपेक्षा जास्त त्यांनी आत्तापर्यंतचे संपूर्ण आयुष्य चित्रपटसृष्टीमध्ये एकापेक्षा एक कलाकृती सादर करण्यात व्यतीत केले आहे आणि अजूनही तोच उत्साह आणि उमेद आपण त्यांच्या कलाकृतींमध्ये पाहतो.

अमिताभ बच्चन यांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत, सामान्यांपासून असामान्यांपर्यंत, गोर गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना आपल्या कलेचा आस्वाद घ्यायची संधी दिली आणि कधीच त्या कलेचा गर्व केलेला नाही. आणि अशा व्यक्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होणे यापेक्षा आनंदाची गोष्ट असू शकत नाही.

दादासाहेब फाळकेंनी चित्रपट सृष्टीची पायाभरणी केली आणि त्याला अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी हातभार लावून एक चांगला दर्जा दिला. करिअरच्या सुरुवातीला सगळीकडून नकारघंटा वाजून देखील त्यांनी तो घंटानाद एका चांगल्या गोष्टीची नंदी असावी अशाच पद्धतीने स्वीकारला आणि मग त्यांच्या आयुषयाला एक नवी भरारी मिळाली ती अजूनही अबाधित आहे. आजही वयाच्या ७६ व्या वर्षी ते तितकेच चिरतरुण व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारामुळे भारतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.


 
@@AUTHORINFO_V1@@