रिव्हॉल्वर दादींच्या प्रवासाची झलक पहा 'सांड की आंख' च्या ट्रेलरमध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |


तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत असलेल्या 'सांड की आंख' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित 'सांड की आंख' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रकाशी तोमर आणि चंद्रो तोमर यांच्या आयुष्याच्या प्रवासाची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमधून त्यांनी सोसलेले कष्ट आणि आपल्या मुलींना चांगले आयुष्य देण्यासाठी त्यांनी केलेला त्याग आणि कष्ट यांची पुरेपूर जाणीव प्रेक्षकांना हा ट्रेलर पाहिल्यावर होईल आणि चित्रपटाविषयीची उत्सुकता देखील वाढेल.

उत्तर प्रदेशातील जोहरी हे भारतातील इतर गावांप्रमाणेच एक टुमदार गाव. मात्र १९९८ सालानंतर या गावाचे नाव देशातच नाही तर देशाबाहेरसुद्धा नावाजले जावू लागले. याचे कारण काय तर या गावात जन्मलेल्या आणि शूटिंग या खेळात भारताचे नाव सर्वदूर पसरवणाऱ्या दोन विलक्षण शुटर, प्रकाशी तोमर आणि त्यांची वाहिनी चंद्रो तोमर. या दोघींना शुटर दादी म्हणून सर्वदूर ओळख मिळाली आहे. 'सांड की आंख' हा चित्रपट त्यांच्याच सत्यकथेवर आधारलेला चित्रपट आहे. कुटुंब, समाज या सगळ्यांवर मात करत या दोघींनी प्रत्येकी तब्बल ३५२ पदके कमावली आहेत. त्यांची ही प्रेरणादायी गोष्ट प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळेल.

भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू या दोघींनीही आत्तापर्यंत अनेक आव्हानात्मक रोल यशस्वीरीत्या साकारले आहेत. मात्र आपल्या वयापेक्षा कितीतरी जास्त वयाच्या स्त्रियांची भूमिका साकारणे हे देखील एक आव्हान त्यांच्यासमोर होते. आता हे आव्हान त्यांना यशस्वीपणे पेलता आले आहे की नाही हे पाहण्यासाठी २५ ऑक्टोबर पर्यंत प्रेक्षांना प्रतीक्षा करावी लागेल.

@@AUTHORINFO_V1@@