खार रोडमध्ये पाच मजली इमारत कोसळली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |

 
 


मुंबई : खार जीमखान्यानजीक पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली. पूजा अपार्टमेंट, असे या इमारतीचे नाव आहे. या इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या. या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे. 

@@AUTHORINFO_V1@@