'म्हाडा कोकण मंडळ लॉटरी २०१८'तील विजेत्यांना अद्याप घरे नाहीत?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |


मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या ९०१८ सदनिका सोडतीतील कल्याण खोणी येथील ९८९ घरांच्या यशस्वी अर्जदारांपैकी ३२ विजेत्यांच्या घर वाटप प्रकियेत म्हाडाकडून अनागोंदी कारभार सुरू असल्याचे समजते.

 

कोकण मंडळाला एकात्मिक वसाहत प्रकल्पांतर्गत कल्याण खोणी येथील पलावा सिटी मध्ये ९८९ घरे मिळाली. ती घरे २०१८ सोडतीत समाविष्ट करून त्यांची सोडत काढण्यात आली. एकूण ८९५ अर्जदार यशस्वी ठरले. यातील ९४ घरांसाठी अर्ज आले नाही. ६२१ विजेत्यांनी १० टक्के प्रशासकीय रकमेचा भरणा केला असून १७ लोकांनी घरे परत केली आहे. ३१ लोकांनी अजून पैसे भरले नाहीत. अशी स्थिती असताना आता या योजनेत सहा महिन्यांच्या आत म्हाडाने विजेत्यांची पात्रता यादी विकासकाला द्यावी, अशी अट होती. आता सहा महिन्यांचा कालावधी म्हाडाकडून संपल्यानंतर विकासकाने काही रहिवाशांना घरे देण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

कोकण मंडळाने वेळेत विजेत्यांची पात्रता यादी विकासकाला दिली असती, तर विजेत्यांना घरे मिळाली असती. मात्र, म्हाडाच्या वेळकाढूपणामुळे विजेते आणि म्हाडा या घरांना मुकणार असल्याचे चित्र आहे. याविषयी कोकण मंडळाचे मुख्याधिकारी कुसेकर यांनी सांगितले की, २० टक्के कोट्यातील घरे सहा महिन्यांच्या आत म्हाडाने विकासकाकडून घेतली पाहिजे, अशी अट आहे. मात्र, यात विलंब झाला असून विकासकाला घरे देण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे, तसेच या योजनेत सहा महिन्यांच्या कालावधी वाढवून दीड वर्षाचा करण्याचा पत्र प्राधिकरणाला दिले आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@