असले पत्रकार आणता कुठून ? : ट्रम्प इमरान खानवर भडकले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |



संयुक्त राष्ट्र : 'असे पत्रकार आणता कुठून ?', अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रश्नाने पाक पंतप्रधान इमरान खान आणि मीडियाच्या अजेंड्याची पोलखोल केली. सोमवारी इमरान खान आणि ट्रम्प यांच्या बैठकीदरम्यान काही पत्रकार ट्रम्प यांना सारखे काश्मिर प्रश्नावरून डिवचत होते. त्यावेळी ट्रम्प यांनी असे पत्रकार कुठून आणता, असा थेट सवाल इमरान खान यांना केला. या प्रश्नामुळे इमरान यांची बोलती बंद झाली.

 

'हे असे पत्रकार तुम्ही कुठून आणता ?'

काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान भारताविरोधात समर्थन मिळवण्यासाठी आपला अजेंडा राबवत आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांसह इतर नेत्यांनीही भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, इमरान खान यांच्याशी संवाद साधत असताना ट्रम्प यांनी पाकिस्तानी मीडियाला बऱ्याचवेळा फटकारले. पाकिस्तानी पत्रकार काश्मिरच्या मुद्द्यावर ट्रम्प यांना भरकटवत होते. एका पाकिस्तानी पत्रकाराने ट्रम्प यांना म्हटले कि, "जम्मू काश्मिरमध्ये ५० दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद आहे. जीवनावश्यक वस्तू बंद आहेत." यावर ट्रम्प यांनी पत्रकारालाच प्रतिप्रश्न केला. "तुम्ही पाकिस्तानच्या मंत्रीमंडळात आहात का ? तुम्ही प्रश्न विचारत आहात कि, वक्तव्य करत आहात."

 

'ओबामा यांना नोबेल पुरस्कार का मिळाला ?'

इमरान खान यांच्याकडे आपला मोर्चा वळवत त्यांनी आणखी एक टोला लगावला. "असे पत्रकार तुम्ही कुठून आणता?" यावर इमरान खान यांची बोलती बंद झाली. दरम्यान काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढल्यास ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळेल या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कार न मिळाल्याबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले, "त्यांनी बराक ओबामा यांना नोबेल पुरस्कार दिला. त्यांना हा पुरस्कार का मिळाला मला समजले नाही."

 

'मोदी यांचे ते विधान आक्रमक'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादाला पोसणारे राष्ट्र असा उल्लेख हाऊडी मोदी या कार्यक्रमादरम्यान केला. "उपस्थितांना हे वाक्य आवडले मात्र, मोदी, असा उल्लेख यावेळी करतील, अशी मला कल्पना नव्हती.", अशी प्रतिक्रीया ट्रम्प यांनी यावेळी दिली. दरम्यान भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश सहमत असतील तर काश्मीरप्रश्नी मध्यस्ती करायला मी तयार आहे, असेही ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@